---Advertisement---

‘टी-२० विश्वचषकासाठी फिट रहायचंय’, इंग्लिश वेगवान गोलंदाची ‘द हंड्रेड’ लीगमधून माघार

On: बुधवार, ऑगस्ट 24, 2022 6:28 PM
England ODI Team
---Advertisement---

इंग्लंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज रिस टोप्ले याने ‘द हंड्रेड‘ लीगमधून माघार घेतली आहे. आगामी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ यावर्षी या स्पर्धेचे यजमानपद भूषवेल. टी-२० विश्वचषात खेळताना कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून रीस टोप्लेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 

इंग्लंडमध्ये प्रामुख्याने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तापमान सर्वात जास्त असते. यादरम्यान रिस टोप्ले (Reece Topley) याने भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना १० सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतल्या. सध्या सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत त्याने ओवल इन्विसिबल्स संघासाठी चार सामन्यात पाच विकेट्स घेतल्या आणि हंगामातून माघार घेतली. टी-२० विश्वचषक (ICC T20 World Cup 2022 ) इंग्लंडसाठी महत्वाचा आहे. या प्रमुख स्पर्धेसाठी फिट राहण्याच्या उद्देशाने त्याने द हंड्रेड (The Hundred) मधून माघार घेतल्याचे समजते.

या निर्णयाची माहिती त्याने स्वतः दिली. त्याने सांगितले की, “व्यस्त उन्हाळ्याचा परिणाम माझ्यावर झाल्यासारखे वाटत आहे. मागच्या काही आटवड्यांमध्ये मला छोट्या विश्रांतीची आवश्यकता जाणवत आहे. दुखापतीतून वाचण्यासाठी अशी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पण संघ स्पर्धेच्या महत्वाच्या टप्प्यात पोहोचल्यानंतर मला त्यांच्यासाठी योगदान देता येणार नाही, याचे मला वाईट वाटते.”

ओवल इन्विसिबल्स संघासाठी रिस द हंड्रेडच्या चालू हंगामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडू शकत होता. इन्बिसिबल्स संघाचे मुख्य प्रसिक्षक टॉम मूडी म्हणाले की, “रीस सारखी प्रतिभा असणाऱ्या खेळाडू गमावल्यामुळे खूप निराश आहे. परंतु, संघ त्याच्या निर्णयाचा सन्मान करते.”

टोप्ले या हंगामातून माघार घेतल्यानंतर द हंड्रेडमधून माघार घेणाऱ्यांची यादी लांबली आहे. त्याच्या आधी या स्पर्धेतून इंग्लंडच्या मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर आणि वेगवान गोलंदाज टाइमल मिल्स यांनीही माघार घेतली होती. बटलरच्या घोट्याला दुखापत झाली आहे, तर मिल्सने अंगठ्याच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत किंवा त्यानंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत बटलर ठीक होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बांगलादेशच घोडं आशिया कप आधीच अडल! एका पाठोपाठ तीन मॅचविनर स्पर्धेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ब्रेट ली म्हणतोय, ‘मला रिषभ पंतला गोलंदाजी करायचीये!’
भारत-पाकिस्तान महामुकाबल्यात ‘या’ पाच जणांत रंगणार ‘बॅटिंग बॅटल’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---