झिम्बाब्वे दाैऱ्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया 3 टी20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर यासाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. आज (17 जुलै) बीसीसीआय या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी श्रीलंका आणि टीम इंडियाच्या टी20 कर्णधारपदसाठी हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांच्या शर्यतीत एक नवे नाव समोर येत आहे. ते म्हणजे सूर्यकुमार यादव. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, सूर्यकुमार यादव श्रीलंका दौऱ्यावर होणाऱ्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करू शकतो. या दौऱ्यावरच नाही तर रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा नवा कायमस्वरूपी टी20 कर्णधार म्हणून त्याची नियुक्ती होऊ शकते.
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘हार्दिक पांड्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय टी20 संघाचा उपकर्णधार होता. तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तीन सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी उपलब्ध आहे. तो संघाचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा होती, परंतु सूर्यकुमार यादव केवळ श्रीलंका मालिकेसाठीच नव्हे तर 2026 च्या टी20 विश्वचषकापर्यंत संभाव्य कर्णधार असेल अशी दाट शक्यता आहे. तो पुढे म्हणाला, ‘हार्दिकचा एकदिवसीय सामन्यांमधून ब्रेक हा वैयक्तिक कारणांमुळे आहे. त्याला फिटनेसची कोणतीही समस्या नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, हार्दिक श्रीलंका दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार नाही. याची माहितीही त्यांनी बीसीसीआयला दिली आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, या दौऱ्यासाठी संघ अंतिम करण्यासाठी निवडकर्ते बुधवारी (17 जुलै) भेटतील.
तर हेड कोचबाबत बोलायचे झाले तर टी20 विश्वचषक 2024 नंतर राहुल द्रविड यांचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिश्रक पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर बीसीसीआयने गाैतम गंभीरला टीम इंडियाच्या हेड कोच पदी निवड केली. तर आगामी श्रीलंका दाैऱ्यापासून त्याच्या कार्यकाळाला सुरुवात होणार आहे. तर श्रीलंका दाैऱ्यासाठी संघ निवडीसाठी हेड कोच गंभीरची भूमिका म्हत्वाची ठरेल.
अलीकडेच, शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध टी20 मालिका 4-1 ने जिंकली. अनेक युवा स्टार्सनाही या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली. रियान पराग, अभिषेक शर्मा, तुषार देशपांडे, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी टी20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. अशा स्थितीत त्यांना श्रीलंका मालिकेत संधी मिळते की नाही हे पाहायचे आहे.
याप्रमाणे असू शकते भारतीय संघ
टी20: सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा/ अभिजित शर्मा/ अभिजित अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान/खलील अहमद/मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, रवी बिश्नोई
एकदिवसीय: केएल राहुल (कर्णधार), अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा/तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, शिवम दुबे/रिंकू सिंग
महत्तवाच्या बातम्या-
निवृत्तीनंतर भारताच्या दिग्गज खेळाडूनं आईसाठी शेअर केली एक खास पोस्ट…!
महिला आयसीसी टी20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत-शफालीनं मारली मुसंडी
मोठ्या मनाचा मोठा खेळाडू! सामनावीर पुरस्कार केला चाहत्याला भेट; VIDEO एकदा पाहाच