भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याची आज(1 ऑगस्ट) टी20 मालिकेने सुरुवात होणार आहे. या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे. मात्र आज या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
लॉडरहिलमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचीही शक्यता आहे.
वेस्ट इंडीज आणि भारत संघातील हा सामना स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहे. यावेळी वातावरण मुख्यत: ढगाळ राहणार असून सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत 23-25 टक्के पावसाची शक्यता आहे.
तसेच स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 नंतर पावसाची 50 टक्के आहे. त्यामुळे कदाचीत सामन्याच्या दुसऱ्या डावात पावसामुळे अडथळा येऊ शकतो. जर या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर डकवर्थ-लुईस प्रणालीचा वापर होऊ शकतो.
विशेष म्हणजे या मालिकेतील दुसरा सामनाही उद्या(4 ऑगस्ट) लॉडरहिल येथेच होणार आहे. पण उद्या पावसाची शक्यता कमी आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आज २४ धावा करताच किंग कोहलीच्या नावावर होणार तो मोठा विक्रम
–‘हिटमॅन’ रोहित शर्माला ‘युनिवर्स बॉस’ गेलला मागे टाकत विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी
–सौरव गांगुली म्हणतो, एक दिवस टीम इंडियाचा कोच नक्की बनेल पण…





