टोकियो ऑलिंपिक २०२० ला २३ जुलैपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत पाच दिवस लोटले आहेत. या खेळांच्या महाकुंभ मेळ्यात विविध देशातील खेळाडू विविध खेळात आपली प्रतिभा दाखवत आहेत. अनेक खेळाडूंनी आपापल्या देशांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करून दिली आहे. आतापर्यंत झालेल्या या स्पर्धेत भारताच्या खात्यात केवळ एकाच पदकाची कमाई झाली आहे. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. वैयक्तिक खेळांमध्ये आणखी २१ खेळाडू आहेत. तसेच ऍथलिटिक्समध्ये एकूण १७ पुरुष आणि ९ महिला खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे कुस्तीमध्ये ४ महिला आणि ३ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.
वैयक्तिक खेळांमध्ये अजून साधारण २१ खेळाडू आहेत. तसेच ऍथलिटिक्समध्ये एकूण १७ पुरुष आणि ९ महिला खेळाडूंचा समावेश आहे. दुसरीकडे कुस्तीमध्ये ४ महिला आणि ३ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त हॉकी या सांघिक खेळातही भारताचे दोन्ही संघ सध्या आव्हान टिकवून आहेत. या खेळांमध्ये भारतीय खेळाडू पदकांची कमाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चला तर ते कोणते खेळ आहेत, याबाबत आज आपण या लेखातून जाणून घेऊया… (Tokyo Olympic 2020 Remaining Games of India)
टोकियो ऑलिंपिक २०२० मधील भारतीय संघाचे आगामी खेळ
नेमबाजी
२९ जुलै- २५ मीटर पिस्टल (महिला)
राही सरनोबत
मनू भाकर
३१ जुलै- ५० मीटर रायफल (महिला)
तेजस्विनी सावंत
अंजूम मोदगिल
२ ऑगस्ट- ५० मीटर रायफल ३ पोझिशन (पुरुष)
संजीव राजपूत
ऐश्वर्य सिंग
बॅडमिंटन
२८ जुलै- महिला एकेरी गट (जे)
पी. व्ही. सिंधू
२८ जुलै- पुरुष एकेरी गट (डी)
साई प्रणीथ (पुढील फेरीसाठी अपात्र)
तिरंदाजी
२८ जुलै- पुरुष एकेरी गट १/३२
दास अतनू
प्रवीण जाधव
२८ जुलै- महिला एकेरी गट १/३२
दीपिका कुमारी
२९ जुलै- पुरुष एकेरी गट १/३२
तरुणदीप राय
बॉक्सिंग
२८ जुलै- महिला मिडलवेट (६९- ७५) राऊंड १६
पूजा राणी
२९ जुलै- महिला फ्लायवेट (४८-५१) राऊंड १६
मेरी कोम
२९ जुलै- पुरुष हेवीवेट (+९१) राऊंड १६
सतीश कुमार
३० जुलै- महिला लाईटवेट (५७-६०) राऊंड १६
सिमरनजीत कौर
३० जुलै- महिला वेल्टरवेट (६४- ६९) उपांत्यपूर्व फेरी- २
लवलीना बोरगोहेन
३१ जुलै- पुरुष फ्लायवेट (४८- ५२) राऊंड १६
अमित पानघल
हॉकी
२९ जुलै- भारत विरुद्ध अर्जेंटिना (पुरुष)
३० जुलै- भारत विरुद्ध जपान (पुरुष)
२८ जुलै- भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन (महिला)
३० जुलै- भारत विरुद्ध आयर्लंड (महिला)
३१ जुलै- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (महिला)
कुस्ती
१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट
महिला कुस्तीपटू
सीमा बिस्ला
विनेश फोगट
अंशु मलिक
सोनम मलिक
पुरुष कुस्तीपटू
रवीकुमार दहिया
बजरंग पुनिया
दीपक पुनिया
ऍथलिट्स
३० जुलै ते ८ ऑगस्ट
पुरुष- १७
महिला- ९
गोल्फ
२९ जुलै- पुरुष राऊंड १
अनिर्बन लहिरी
उदयन माने
ऑगस्ट- महिला राऊंड १
आदिती अशोक
नौकानयन
२८ जुलै- पुरुष लाईटवेट डबल स्कल्स उपांत्य फेरी ए/बी २
लाल जाट अर्जुन/ अरविंद सिंग
स्विमिंग
२९ जुलै- १०० मीटर बटरफ्लाय हीट२
साजन प्रकाश
घोडेस्वारी
फवाद मिर्झा
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?