जपानची राजधानी टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमागील दुष्टचक्र सुरूच आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोना महामारीमुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. सोबतच, अनेक वाद या ऑलिम्पिकबाबत समोर येत आहेत. टोक्यो ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांनी एक मोठा निर्णय घेऊन सर्वांना चकित केले आहे.
ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय
टोक्यो ऑलिम्पिक व पॅराऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष याशिरो मोरी यांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिलांबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना हा राजीनामा द्यावा लागला. जपानमधील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या क्योदो न्यूजने याबाबतची पुष्टी केली आहे.
हे होते प्रकरण
मोरी यांनी ऑलिम्पिक समितीच्या ऑनलाईन बैठकीत म्हटले होते की, ‘महिला अशा महत्त्वाच्या बैठकीत खूप गप्पा मारतात.’ एकूण २५ सदस्यांमध्ये फक्त पाच महिला आहेत. मोरी यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला होता. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर याचा निषेधही व्यक्त केला गेलेला.
या प्रकरणानंतर मोरी यांनी जाहीर माफी मागितली होती. माफी मागताना त्यांनी म्हटले, “माझे वक्तव्य अत्यंत चुकीचे होते. ऑलिम्पिक तसेच पॅराऑलिम्पिकच्या मूल्यांना अनुसरून हे विधान नव्हते. मात्र, मी राजीनामा देणार नाही. मी मागील सात वर्षांपासून बरीच मेहनत घेतली आहे.” आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने देखील त्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली नव्हती.
चालू वर्षी होणार टोक्यो ऑलिम्पिक
नियोजित कार्यक्रमानुसार टोक्यो ऑलिम्पिक २४ जुलै ते ९ ऑगस्ट यादरम्यान पार पडणार होते. मात्र, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही स्पर्धा एक वर्षांने पुढे ढकलण्यात आली. आता ही स्पर्धा २३ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत संपन्न होईल. जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी टोक्यो ऑलिम्पिक ठरलेल्या वेळेत आयोजित करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता