---Advertisement---

चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थान

On: गुरूवार, फेब्रुवारी 11, 2021 7:23 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांचा दरम्यान चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने हा सामना जिंकत १-०ने आघाडी घेतली आहे.‌ भारतीय फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे देखील या सामन्यात अवघी एक धाव काढून परतला. यासह रहाणेच्या नावे एक लाजिरवाणी कामगिरी जमा झाली आहे.

अजिंक्य रहाणेचे अपयश
चेन्नई येथील पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी फलंदाज रहाणे पूर्णत: अपयशी ठरला. रहाणे पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. पहिल्या डावात डॉम बेसच्या गोलंदाजीवर जो रूटने त्याचा अप्रतिम झेल टिपला. तर, दुसऱ्या डावात जेम्स अँडरसनने बिना खाते खोलता त्याला शून्यावर त्रिफळाचीत केले. यावेळी तो अवघ्या तीन चेंडूंचा सामना करू शकला.

अँडरसनने केले सर्वाधिक वेळा बाद
दुसऱ्या डावात अँडरसनने रहाणेला शून्यावर बाद केले. त्यामुळे अँडरसनच्या गोलंदाजीवर सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याची नकोशी कामगिरी रहाणेच्या नावे झाली. अँडरसनने रहाणेला कसोटीमध्ये चौथ्यांदा शून्यावर बाद केले. रहाणेपूर्वी अँडरसनने भारताच्याच वीरेंद्र सेहवाग व मुरली विजय यांना प्रत्येकी तीन वेळा कसोटीमध्ये शून्यावर बाद केले होते. परंतु आता रहाणेने सेहवाग आणि मुरली यांना मागे टाकत या लाजिरवाणी कामगिरीत प्रथमस्थान गाठले आहे.

फॉर्मशी झगडत आहे रहाणे
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या रहाणे मागील काही काळापासून संघर्ष करताना दिसत आहे. सन २०२० पासून रहाणेने खेळलेल्या सात कसोटी सामन्यात तो फक्त एक शतक झळकावू शकला आहे. तर, त्याला या दरम्यान अर्धशतकाची वेस एकदाही ओलांडता आली नाही. या काळात त्याने २७.६९ च्या सरासरीने २४८ धावा काढल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित मालिकेत त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई

दुसर्‍या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटीतून बाहेर होऊ शकतात ‘हे’ ३ खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---