टोकियो ऑलिंपिक २०२० मधील दुसरा म्हणजेच शनिवार (२४ जुलै) हा भारतासाठी काही खास ठरला नाही. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. मात्र, भारताच्या पदकाचे खाते नक्की उघडले आहे. भारतीय वेट लिफ्टर मिराबाई चानूने दुसऱ्या दिवशी ‘रौप्य’ पदक जिंकून भारताच्या झोळीत पहिले पदक टाकले. अशातच आता तिसऱ्या दिवसावर म्हणजेच २५ जुलैवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. रविवारी टोकियो ऑलिंपिकमध्ये मेरी कोम, पीव्ही सिंधू आणि जी साथियान यांसारख्या स्टार खेळाडू मैदानावर उतरणार आहेत. चला तर जाणून घेऊया रविवारी भारतीय वेळाप्रमाणे होणारे खेळांचे वेळापत्रक. (Tokyo Olympics 2020 25 th July Schedule Mary Kom PV Sindhu And G Sathiyan In Action)
बॅडमिंटन
सकाळी ७ वाजता- महिला एकेरी गटात पीव्ही सिंधू विरुद्ध केसेनिया पोलिकारपोव्हा (इस्रायल)
बॉक्सिंग
दुपारी १.३० वाजता- ५१ किलो वजनी गटाचा सुरुवातीचा राऊंड ३२ सामन्यात एम सी मेरी कोम विरुद्ध हर्नांडिज गार्सिया (डोमिनिका गणराज्य)
दुपारी ३.०६ वाजता- ६३ किलो वजनी गटाचा सुरुवातीचा राऊंड ३२ सामन्यात मनीष कौशिक विरुद्ध ल्यूक मॅकोरमॅक (ब्रिटन)
हॉकी
दुपारी ३.०० वाजता- पुरुषांच्या पूल ए सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
सेलिंग
सकाळी ८.३५ वाजता- महिला वन पर्सन डिंघी, लेजर रेडियल (पहिली रेस, दुसरी रेस) नेत्रा कुमानन
सकाळी ११.०५ वाजता- पुरुषांच्या वन पर्सन डिंघी, लेजर (पहिली रेस, दुसरी रेस) भारताचा विष्णू सर्वनन
बोटिंग
सकाळी ६:४० वाजता- लाइटवेट पुरुष डबल स्कल्स रेपेशाज (भारत)
नेमबाजी
सकाळी ५.३० वाजता- महिलांच्या १० मीटर एअर रायफल क्वालिफिकेशनमध्ये यशस्विनी सिंग देसवाल आणि मनू भाकर
सकाळी ६.३० वाजता- स्कीट पुरुष क्वालिफिकेशन- पहिला दिवस (मैराज अहमद खान आणि अंगद वीर सिंग बाजवा)
सकाळी ९.३० वाजता- पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल क्वालिफिकेशनमध्ये दीपक कुमार आणि दिव्यांश सिंग पंवार
टेबल टेनिस
सकाळी १०.३० वाजता- पुरुष एकेरी दुसरा राऊंड- जी साथियान विरुद्ध लाम सियू हाँग (हाँगकाँग)
दुपारी १२.०० वाजता- महिला एकेरी दुसरा राऊंड- मनिका बत्रा विरुद्ध मार्गारेटा पेसोत्स्का (युक्रेन)
टेनिस
सकाळी ७.३० वाजता- महिला मिश्र गटात पहिल्या राऊंडच्या सामन्यात सानिया मिर्झा आणि अंकिता रैना विरुद्ध लिडमयला आणि नादिया किचनोक (युक्रेन)
स्विमिंग
दुपारी ३.३२ वाजता- महिलांची १०० मीटर बॅकस्ट्रोक, पहिली हीट- माना पटेल
दुपारी ४.२६ वाजता- पुरुषांची १०० मीटर बॅकस्ट्रोक, तिसरी हीट- श्रीहरी नटराज
महत्त्वाच्या बातम्या-
-भारतीय हॉकी संघाचा न्यूझीलंडवर ३-२ ने दणदणीत विजय, गोलकिपर श्रीजेश ठरला नायक
-भारतीय नेमबाज सौरभ चौधरी चमकला, १० मी. एयर पिस्टल अंतिम फेरीचे मिळवले तिकीट
-आनंदाची बातमी: भारताचा प्रविण जाधव- दिपीका कुमारी जोडी तिरंदाजीत उपांत्यपुर्व फेरीत