कोरोना या साथीच्या आजाराने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेण्याचे आवाहन सरकार सातत्याने करत आहे. मात्र, खबरदारी बाळगूनही अगदी लहान चुकांमुळेसुद्धा कोरोनाची लागण झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. सध्या जगात कोरोनाची लस तयार झाली असून नागरिकांवर चाचणी सुरु आहे. ही लस लवकरच सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल, अशाही बातम्या समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्गज भारतीय कुस्तीपटूने एक महत्वाचे विधान केले आहे.
खेळाडूंसाठी लस आवश्यक -सुशील कुमार
सुशील कुमारने प्रशिक्षणातील अडचणी व साथीच्या आजारांमुळे खेळाडूंना उद्भवणाऱ्या आव्हानांची माहिती दिली.
“आम्ही ऑलिम्पिकची तयारी करत आहोत आणि मला वाटते की कोविड-19 ची लस अतंत्य आवश्यक आहे, कारण आम्ही खेळताना सतत एकमेकांना स्पर्श करतो. माझे बरेच सहकारी कुस्तीपटू या विषाणूमुळे संक्रमित झाले आहेत आणि ही खेळाडूंसाठी खरोखर कठीण परिस्थिती आहे. खेळाडू जेव्हा प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ करतात, तेव्हा बऱ्याच वेळा त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून लस येणे खरोखर महत्वाचे आहे.”
….त्यांना नव्याने करावी लागेल सुरुवात
पुढे बोलताना सुशील म्हणाला की, “कुस्तीपटूंनी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे आणि ते लय गाठण्यासाठी तयार आहे. मात्र, कोरोनाची लागण झाल्यास, त्यांना नव्याने सुरुवात करावी लागेल.”
काळजी घेण्याचे केले आवाहन
सुशीलने खेळाडूंना या रोगाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी सर्व खेळाडूंना विनंती करू इच्छितो की कृपया सर्व निकष पूर्ण करा आणि आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या, कारण आपण कोणत्याही राज्य स्पर्धेची नव्हे, तर ऑलिम्पिकची तयारी करत आहात.”
वाचा-
बापरे ! वयक्तिक विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय कुस्तीपटूंना लागणार ‘इतका’ खर्च
लाल मातीतील पठ्ठ्या बनला फौजदार! पैलवान राहुल आवारे पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पदी
ठरलं ! वयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटू ‘या’ तारखेला होणार, पाहा वेळापत्रक