सर्बियातील बेलग्रेड येथे 12 ते 18 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी 42 सदस्यांची भारतीय तुकडी रवाना होणार आहे. या संपूर्ण सहलीमध्ये विमानाचे तिकिट, बोर्डिंग आणि इतर गोष्टींचा समावेश असेल. यासाठी लागणाऱ्या खर्चाचा खुलासा भारतीय क्रीडा प्राधिकरणाने केला आहे.
या स्पर्धेतील सहभागासाठी सरकारकडून एकूण 90 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. एसएआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “यात हवाई तिकिट, बोर्डिंग व लॉजिंग, युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा परवाना शुल्क, व्हिसा फी आणि खेळाडू, प्रशिक्षक आणि रेफरी यांचा भत्ता, या सर्वांचा समावेश असेल.”
मार्चमध्ये कोविड-19 या साथीच्या आजारामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लावण्यात आले होते. लोकडाऊननंतर भारतीय कुस्तीपटूंची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
यूडब्ल्यूडब्ल्यूने गेल्या महिन्यात ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’ला पर्याय म्हणून’ वैयक्तिक विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला होता.
वैयक्तिक विश्वचषकातील कुस्ती संघ:
फ्री स्टाईलः रवी कुमार (57 किलो), राहुल आवारे (61 किलो), नवीन (70 किलो), नरसिंग यादव (74 किलो), गौरव बालियन (79 किलो), दीपक पूनिया (86 किलो), सत्यव्रत कादियन (97 किलो), सुमित (125 किलो)
ग्रीको रोमन: अर्जुन हलकुर्की (55 किलो), ज्ञानेंद्र (60 किलो), सचिन राणा (63 किलो), आशु (67 किलो), आदित्य कुंडू (72 किलो), साजन (77 किलो), गुरप्रीत सिंग (82 किलो), सुनील कुमार (87 किलो), हरदीप ( 97 किलो) नवीन (130 किलो)
महिला कुस्ती: निर्मला देवी ( 50 किलो), पिंकी ( 55 किलो), अंशु (57 किलो), सरिता (59 किलो), सोनम ( 65 किलो), साक्षी मलिक (65 किलो), दिव्या काक्रण ( 68 किलो), गुरशरण कौर (72 किलो), किरण (76 किलो)
महत्त्वाच्या बातम्या –
लाल मातीतील पठ्ठ्या बनला फौजदार! पैलवान राहुल आवारे पुणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक पदी
ठरलं ! वयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीपटू ‘या’ तारखेला होणार, पाहा वेळापत्रक
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार