भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (4 डिसेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना भारताने 11 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.
भारताच्या डावादरम्यान अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागला, त्याला त्रास जाणवत आल्यामुळे तो दुसऱ्या डावात मैदानात येऊ शकला नाही. त्याच्या जागी कन्कशन सब्स्टिट्यूट म्हणून फिरकीपटू युझवेंद्र चहल मैदानात उतरला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
सब्स्टिट्यूट खेळाडू त्याच प्रकारचा असावा -हेन्रीक्स
सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मोईझेस हेन्रीक्स म्हणाला की, “कन्कशनचा निर्णय घेण्यात आला याबद्दल काहीच आपत्ती नाही. मात्र, सब्स्टिट्यूट खेळाडू त्याच प्रकारचा असला पहिजे. जडेजा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने फलंदाजीही केली होती. परंतु चहल गोलंदाज आहे.”
जडेजाला आली चक्कर
जडेजाच्या प्रकृतीविषयी बोलताना कोहली म्हणाला की, “चेंडू जडेजाच्या डोक्याला लागला, त्यानंतर त्याला चक्कर आली. आताही त्याची प्रकृती बरी नाही. फलंदाजीदरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली.”
डावाच्या शेवटच्या षटकांत डोक्याला लागला चेंडू
डावाच्या 20 व्या षटकातील दुसरा चेंडू जडेजाच्या बॅटला चाटून गेला आणि हेल्मेटला लागला. यानंतरही जडेजा फलंदाजी करत राहिला. मिशेल स्टार्कच्या या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने सलग दोन चौकार ठोकले. या सामन्यात त्याने नाबाद 44 धावा केल्या.
भारताने जिंकला सामना
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 161 धावा केल्या होत्या. भारताने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 150 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला.
चहलला मिळाला मालिकावीर पुरस्कार
कन्कशन सब्स्टिट्यूट युझवेंद्र चहलने 4 षटकांत 25 धावा देत 3 गडी बाद केले. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
चहल-नटराजनची जोडी नंबर- १! पहिल्या टी२० मध्ये नोंदवला खास विक्रम
काय पायगुण आहे राव! ‘हा’ खेळाडू संघात असताना मागील २० सामन्यांत भारताने मिळवलाय विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील २ टी२० सामन्यांतून जडेजा बाहेर; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी