भरतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. भारताने मिळवलेल्या पदकांच्या यादित आणखी दोन पदकांची भर पडली आहे. भारताचा उंच उडीपटू मरियप्पन थंगावेलुने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अप्रतिम प्रदर्शन करत पुरुष उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. या स्पर्धेत विश्वविक्रम नावावर असलेला यूएसएचा सॅम ग्रेवेने १.८८ मीटरची सर्वश्रेष्ठ उडी मारली आणि सुवर्णपदक जिंकले आहे. स्पर्धेत भारताच्याच शरद कुमारने कांस्यपदक जिंकले आहे. या दोन खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे यवर्षीच्या पाॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक १० पदके जिंकली आहेत.
मरियप्पन थंगावेलु आणि सॅम ग्रेवे यांच्यामध्ये स्पर्धेत काट्याची टक्कर पाहायला मिळाली. स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये पाऊस आला होता आणि याचा परिणाम खेळावर झाला होता. मरियप्पाने १.८६ मीटर, तसेच सुवर्णपदक विजेता ग्रेवेने १.८८ मीटरची उंच उडी मारली. मरियप्पन त्याच्या तिन्ही प्रयत्नांत १.८८ मीटरच्या टप्प्यापर्यंत उडी मारू शकला नाही. मात्र, ग्रेवेने त्याच्या अंतिम प्रयत्नात हा टप्पा पार केला.
यापूर्वी रियो पॅरालिम्पिकमध्ये मरियप्पनने सुवर्णपदक जिंकले असून सॅम ग्रेवेने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. त्यावेळी मरियप्पनने १.८९ मीटरची उंच उडी मारली होती आणि सुवर्णपदक त्याच्या नावावर केले होते.
Just as at Rio 2016, #IND have 2️⃣ athletes in the podium places in Men's High Jump T63 Final! 🔥🔥
Mariyappan Thangavelu and Sharad Kumar have won #silver and #bronze medals respectively, taking 🇮🇳's medal tally into double figures! 😍#Tokyo2020 #Paralympics #ParaAthletics pic.twitter.com/HSadcK8Nnt
— Olympic Khel (@OlympicKhel) August 31, 2021
आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेता शरद कुमारने १.८३ मीटरची उडी मारली आणि कांस्यवदकाचा मानकरी ठरला आहे. हे त्याचे व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन नव्हते. त्याचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन १.८९ मीटर एवढे आहे. थंगावेलु आणि शरदच्या आधी नेमबाजीमध्ये सिंघराजने पुरुष १० मीटर एअरपिस्टल एसएच १ स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण १० पदके जिंकली आहेत.
Soaring higher and higher!
Mariyappan Thangavelu is synonymous with consistence and excellence. Congratulations to him for winning the Silver Medal. India is proud of his feat. @189thangavelu #Paralympics #Praise4Para pic.twitter.com/GGhtAgM7vU
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2021
मरियप्पन आणि शरद या दोघांना त्यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करत लिहिले आहे की, ‘उंच आणखी उंच उडान! मरियप्पन थंगावेलु निरंतरता आणि उत्कृष्टतेचा पर्याय आहे, रौप्य पदक जिंकल्याबद्धल त्यांना शुभेच्छा. भारताला त्यांच्या या कारनाम्यावर गर्व आहे.’
The indomitable @sharad_kumar01 has brought smiles on the faces of every Indian by winning the Bronze Medal. His life journey will motivate many. Congratulations to him. #Paralympics #Praise4Para pic.twitter.com/uhYCIOoohy
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2021
‘अदम्य! शरद कुमारने कास्यपदक जिंकून प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे. त्याचा जीवन प्रवास अनेक लोकांना प्रेरित करेल. त्यांना शुभेच्छा,’ असे मोदींनी शरदचे कौतुक करताना लिहिले.
तमिळनाडूचा मरियप्पनचा ५ वर्षांच्या वयात बसखाली चेंगरल्यामुळे उजवा पाय खराब झाला होता. त्यानंतर त्याचे वडील कुटुंब सोडून गेले आणि त्याच्या आईने त्याच्ये पालनपोषण केले. त्याची आई अगोदर मजुरी करत असे आणि नंतर भाजीपाला विक्री करू लागली. तसेच, पटनाचा रहिवासी शरद कुमारला दोन वर्षांचा असताना पोलिओचा खोटा खुराक दिला गेल्यामुळे त्याचा डावा पायाला लकवा मारला. त्याने त्याच्या कारकिर्दीत दोन वेळा आशियाई पॅरा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अवनी लेखराच्या यशाने भारावला संपूर्ण देश; क्रीडाविश्वातूनही होतोय कौतुकाचा वर्षाव
एकही दिल कितनी बार जितोगे! ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
टोकियो पॅरालिम्पिक: शूटिंगमध्ये भारताला दुसरे पदक, सिंगराज अडानाने ‘कांस्यपदका’ला घातली गवसणी