इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला होता. तसेच दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले होते. ही मालिका आता १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना हा निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज सध्या साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहेत. ज्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. त्याची फलंदाजी सरासरी ४० पेक्षाही कमी आहे. तसेच नुकत्याच सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याने १८, १०, १, ६१ आणि ५ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. अनेक दिग्गजांनी असेही म्हटले आहे की, अजिंक्य रहाणेला संघांबाहेर करून युवा सूर्यकुमार यादवला संधी द्यावी.
यापूर्वी झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील त्याने सर्वांना निराश केले होते. अंतिम सामन्यात त्याने ४९ आणि १५ धावा केल्या होत्या. अशातच रहाणेचे येत्या चौथ्या कसोटी सामन्यात खेळणे कठीण दिसून येत आहे. त्यामुळे रहाणे जर संघ संघाबाहेर झाला तर संघाचे उपकर्णधारपद कोणाला दिले जाईल?, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Ajinkya Rahane running in poor form can snatch team India’s vice captaincy will rohit sharma became new vice captain)
अजिंक्य रहाणेला जर संघाबाहेर केले गेले तर, मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माला कसोटी संघाचे उपकर्णधारपद देण्यात येऊ शकते. रोहितने जानेवारी २०२० नंतर १० कसोटी सामन्यात ४५.१७ च्या सरासरीने ८६८ धावा केल्या आहेत. तसेच इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत देखील तो चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने या कसोटी मालिकेतील ६ डावात अनुक्रमे १९, ५९, ८३, २१, ३६ आणि १२ धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित शर्मा या पदासाठी प्रबळ दावेदार आहे. चौथा कसोटी सामना येत्या २ सप्टेंबरपासून ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा मोठा निर्णय; पितृत्व रजेमुळे बटलर उर्वरित मालिकेतून बाहेर, ‘हा’ खेळाडू नवा उपकर्णधार
चौथ्या कसोटीतील ५ दिवस कसे असेल लंडनचे हवामान? पावसाची आहे दाट शक्यता
बिग ब्रेकिंग! तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात ‘या’ वेगवान गोलंदाजाची निवड, करणार कसोटी पदार्पण