---Advertisement---

कोलकाताने संघातून बाहेर काढल्यानंतर या खेळाडूने चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर केली रसेलची थट्टा, पाहा काय म्हणाला

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सची आयपीएल 2021 सत्राच्या सुरुवातीच्या टप्प्यातील कामगिरी खूप निराशाजनक राहिली आहे. या सत्रात त्यांनी खेळलेल्या चार सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. संघातील खेळाडू चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी ठरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या अपयशाबद्दल आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये सोडलेले खेळाडू या संघाची थट्टा करताना दिसत आहेत.

त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध झालेल्या पराभवानंतर केकेआरने आयपीएल 2021 च्या लिलावामध्ये संघाबाहेर केलेल्या टॉम बॅटनने कोलकता संघाच्या अपयशावरती आणि संघातील अष्टपैलू आंद्रे रसेलच्या खेळीची थट्टा केली आहे. त्याच्या सोबतच इतर संघातील खेळाडूंनी त्याला साथ दिली आहे.

कोलकाता नाइट रायडर्सच्या कामगिरीची आणि रसेलच्या खेळाची चेष्टा करणारा हा इंग्लंडचा टॉम बॅटन मागील तीन हंगामात केकेआर संघाचा भाग होता. यामध्ये त्याने फक्त 18 धावा केल्या होत्या. त्याची खराब कामगिरी पाहता संघ व्यवस्थापनाने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला.

केकेआर संघाने संघाबाहेर केल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त करत “मी काही बेंचची शोभा वाढवण्यासाठी नसून मलाही क्रिकेट खेळायचे आहे,” असे तो म्हणाला होता. यानंतरही त्याचा राग शांत न झाल्याने त्याने ट्वीट करून कोलकाता संघाच्या अपयशावर आणि आंद्रे रसेलच्या खेळीची चेष्टा करण्यास सुरुवात केली.

त्याने ट्वीट करत ‘आंद्रे रसेल एक जोक आहे’ असे म्हटले आहे. त्याने केलेल्या या ट्विटला दिल्ली कॅपिटल्स संघातील त्याचा सहकारी सॅम बिलिंग्ज यानेही साथ दिली. या ट्वीटवर त्याने प्रतिक्रिया देताना आहे. “ओ प्रिय टॉम” असे म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने केलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आंद्रे रसेलने 22 चेंडूत 54 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 षटकार आणि केवळ 3 चौकारांचा समावेश होता. परंतु स्फोटक फलंदाजी करूनही तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

चेन्नईच्या प्रशिक्षकांनी सांगितले १४ व्या हंगामातील संघाच्या चांगल्या कामगिरीमागील कारण

सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा

पहिल्या तीन सामन्यातील अपयशानंतर ऋतुराज गायकवाडवर का ठेवला विश्वास, धोनीने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---