---Advertisement---

चेन्नईच्या प्रशिक्षकांनी सांगितले १४ व्या हंगामातील संघाच्या चांगल्या कामगिरीमागील कारण

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 1:57 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 च्या सत्रातील चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी खूपच चांगली राहिली आहे. आयपीएलच्या 13 व्या सत्रात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या सीएसकेने यंदाच्या आयपीएल मोसमात आत्तापर्यतच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यानंतर सीएसके संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी संघाच्या चमकदार कामगिरीबाबत वक्तव्य केले आहे.

या सामन्यानंतरच्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, “चारपैकी तीन सामने जिंकणे अपेक्षेपेक्षा जास्त आहे. कारण आम्ही पाच पैकी फक्त तीन सामने जिंकण्याची अपेक्षा केली होती. पुढील दोन सामने जिंकले तर खूपच चांगले होईल.”

पुढे ते म्हणाले की, “आम्ही ज्याप्रकारे फलंदाजी करीत आहोत, त्याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. फलंदाजी विभागातली आमची कामगिरी खरोखरच चांगली आहे.”

सॅम करनने मागील हंगामातील आपला फॉर्म कायम ठेवला असून ऑफस्पिन अष्टपैलू मोईन अली हा सुद्धा तिसर्‍या क्रमांकावरचा फलंदाज म्हणून चांगली भूमिका बजावत आहे.”

पुढे त्यांनी असेही सांगितले की संघाच्या वृत्तीत बदल झाल्याने यंदा मोठा फायदा झाला. ते म्हणाले की, “आम्ही सध्या संघात काही नवीन खेळाडू जोडले आहेत, ज्यामुळे फरक पडला आहे. पण वृत्तीत बदल करणे हा मुख्य घटक आहे, ज्यामुळे मानसिकता बदलली.”

यासामन्याअगोदरही त्यांनी मोईन अलीची जोरदार प्रशंसा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, “मोईन अलीच्या अष्टपैलू खेळीमुळे संघाला बळकटी मिळाली आहे. त्याने मागील मोसमात भासत असलेली अष्टपैलूची कमतरता यंदा भरून काढली आहे. सध्या तो ज्याप्रकारची खेळी करत आहे, ते पाहून आम्ही खूप आनंदी आहोत.”

पुढे ते म्हणाले की, “आम्ही सध्या ज्या प्रकारची कामगिरी करत आहे ते पाहून आम्ही खूश आहोत. तसेच आमच्याकडे असलेल्या संसाधनांचा उपयोग करून आम्ही विरोधी संघास चांगलीच टक्कर देणार असून सध्या आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळत आहोत.”

महत्त्वाच्या बातम्या –

सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा

पहिल्या तीन सामन्यातील अपयशानंतर ऋतुराज गायकवाडवर का ठेवला विश्वास, धोनीने सांगितले कारण

मुंबई इंडियन्स संघाची ‘ही’ आहे सर्वात मोठी ताकद, ट्रेंट बोल्टने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---