बांगलादेश संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर (Bangladesh tour of new zealand) आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला होता (newzealand vs Bangladesh) . तर दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंड संघाने ५२१ धावांचा डोंगर उभारला आहे, ज्यामध्ये दुहेरी शतकी खेळी करणाऱ्या टॉम लेथमने (Tom latham) मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला होता. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंड संघाने ६ बाद ५२१ धावा करत डाव घोषित केला आहे. ज्यामध्ये संघातील सलामीवीर टॉम लेथमने ३७३ चेंडूंमध्ये ३४ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने २५२ धावांची खेळी केली.
व्हिडिओ पाहा-
या खेळीसह त्याने न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ९ वे स्थान मिळवले आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी आहे, या संघातील दिग्गज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलम (Brendon macculam), ज्याने ३०२ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या स्थानी आहे, एम क्रो ज्याने २९९ धावांची खेळी केली होती. तसेच रॉस टेलरने (Ross Taylor) २९० धावांची खेळी करत तिसऱ्या क्रमांकावर ताबा मिळवला आहे. यापूर्वी देखील टॉम लेथमने नाबाद २६४ धावांची खेळी केली होती.
कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोच्च धावसंख्या:
३०२ धावा – ब्रेंडन मॅक्युलम (२०१४)
२९९ धावा – एम क्रो (१९९१)
२९० धावा – रॉस टेलर (२०१५)
२७४ धावा – स्टिफन फ्लेमिंग (२००३)
२६७ धावा – ब्रायन यंग (१९९७)
२६४ धावा* – टॉम लॅथम (२०१८)
२६२ धावा – स्टिफन फ्लेमिंग (२००६)
२५९ धावा – जी टर्नर (१९७३’)
२५२ धावा* – टॉम लॅथम (२०२२)
२५१ धावा – केन विल्यमसन (२०२०)
Tom Latham is dismissed for 252 👏
This is the highest ever individual Test score at the Hagley Oval in Christchurch.
Watch #NZvBAN on https://t.co/WngPr0Ns1J (in selected regions) #WTC23 pic.twitter.com/nT4XBhyofC
— ICC (@ICC) January 10, 2022
तसेच टॉम लेथमच्या नावावर आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. वॉरेन हॅडलीने ११६ धावांची खेळी केली होती. तर ग्लेन टर्नरने ११३ धावांची खेळी केली होती.
यासह तो कर्णधार म्हणून न्यूझीलंड संघासाठी २ दुहेरी शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ग्लेन टर्नरने आणि ब्रेंडन मॅक्क्युलमने देखील २ दुहेरी शतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या :
केपटाऊन कसोटीपूर्वी यजमान घेणार धक्कादायक निर्णय? प्लेइंग इलेव्हनमध्ये…
‘किंग कोहली’ एका इंस्टाग्राम पोस्टमधून कमावतो कोट्यावधी रुपये, आकडा ऐकून बसेल धक्का
हे नक्की पाहा :