बुधवारपासून (दि. 30 ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघातील सामन्याने आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात झाली. असे असले तरी, सर्व क्रिकेटप्रेमींची नजर ही भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावर आहे. असे असताना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांनी या सामन्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
जगातील सर्वात मोठी क्रिकेट रायवलरी म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकडे पाहिले जाते. दोन्ही देशातील कसोटी सामन्यांच्या ऍशेस मालिकेला सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा म्हटली जाते. मात्र, एकेकाळी याच ऍशेसमध्ये सहभागी झालेल्या टॉम मूडी यांनी आता भारत आणि पाकिस्तान ही रायवलरी सर्वात मोठी असल्याचे म्हटले.
आशिया चषक स्पर्धेच्या गेम प्लानमध्ये बोलत असताना ते म्हणाले,
“भारत आणि पाकिस्तान यांनी ऍशेसच्या पुढची पायरी गाठलेली आहे. ही एक शानदार गोष्ट असून, दोन्ही संघाचे खेळाडू जबरदस्त आहेत. भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा थेट सामना यावेळी होईल. भारताकडे फलंदाजी खोली दिसते ती पाकिस्तानकडे दिसून येत नाही. आपल्याला आशिया चषकामध्ये तसेच विश्वचषकात या दोन्ही संघातील जबरदस्त सामने पाहायला मिळतील.”
भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी आमने-सामने येत आहे. हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथे खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळला जाईल. स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. भारताचे नेतृत्वा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या खांद्यावर आहे, तर बाबर आझम (Babar Azam) पाकिस्तानचे नेतृत्व करणार आहे.
(Tom Moody Said India Pakistan Rivalry Is Bigger Than Ahes)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी