इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ३० वा सामना आज (०३ मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे रात्री ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी एक धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. आज केकेआर आणि आरसीबी यांच्यात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. ईएसपीएन क्रिकइंफोने याबद्दल माहिती दिली आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, केकेआर संघातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे त्यांना विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. याच कारणास्तव हा सामना रद्द करुन इतर कोणत्या दिवशी खेळवला जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, केकेआरचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे केकेआरने खबरदारीचा उपाय म्हणून सामना न खेळण्याचे ठरवले आहे.
BREAKING: Tonight's IPL match between the Kolkata Knight Riders and Royal Challengers Bangalore has been rescheduled #IPL2021
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 3, 2021
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी स्पोर्ट्स्टारला यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मला बीसीसीआयच्या सीईओंकडून संदेश आला होता की, आज होणारा केकेआर विरुद्ध आरसीबी सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्यासाठीही नविन तारीख लवकरच घोषित केली जाईल.
आता हा सामना नक्की कोणत्या दिवशी खेळवला जाईल? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आमदार अशोक दिंडा! जगाने ट्रोल केलेला क्रिकेटर दिंडा राजकारणाच्या पीचवर सुपरहिट
‘नटराज मनिष’, एक पाय वर करत पांडेने खेळला आगळा वेगळा शॉट; आल्या भन्नाट प्रतिक्रिया