बीसीसीआयने गुरुवारी (६ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शिखर धवन या मालिकेत भारताचे नेतृत्व करणार आहे. मागच्या सात महिन्यांमध्ये धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा सातवा खेळाडू ठरला आहे. तर दुसरीकडे रोहित शर्मा नियमित कर्णधार बनल्यापासून विदेशात एकही सामना खेळला नाहीये. वेस्ट इंडीज दौऱ्यात धवनला कर्णधार बनवल्यानंतर बीसीसीआय सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे.
एका चाहत्याने मजेशीर मिम शेअर करत लिहिले की,’ बीसीसीआयने खेळाडूंमध्ये कांद्या-बटाट्यासारखे कर्णधारपद वाटले आहे. २०२२च्या सुरुवातीला केएल राहुल (KL Rahul) याला संघाचा कर्णधार बनवले गेले होते. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वात संघाने सामना खेळला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा राहुल संघाचा कर्णधार बनला होता. तसेच वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचा कर्णधार होता.
BCCI giving captaincy to the players nowadays pic.twitter.com/hB4usx0AOE
— djay (@djaywalebabu) July 6, 2022
एका चाहत्याने लिहिले की, बीसीसीआय कर्णधारपदाची खुर्ची मध्ये ठेवून खेळाडूंसोबत खेळत आहे आणि सर्वांना वेळोवेळी कर्णधारपदाची संधी मिळत आहे. एका नेटकऱ्यांने म्हटले की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर कोणताही खेळाडू कर्णधारपदाचा भार संभाळू शकला नाहीये.
captaincy situation for Indian cricket right now. #BCCI pic.twitter.com/ezHUKQChPE
— Aadvik (@thecoolguy03) July 6, 2022
काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील टी-२० मालिकेत रिषभ पंत (Rishabh Pant) भारताचा कर्णधार होता. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) संघाचे नेतृत्व करत होता, तर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पहिल्यांदा संघाचा कर्णधार बनला होता. अशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी धवनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर चाहते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Video: इंग्लंडमध्ये झाले धोनीचे बर्थडे सेलिब्रेशन, रिषभ पंतही होता उपस्थित
प्रतीक्षा संपली! अखेर भारत पाकिस्तान लवकरच भिडणार, वाचा कधी आणि कुठे होणार सामना