आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे सर्वाधिक लोकप्रिय संघांमध्ये गणले जातात. चेन्नई आत्तापर्यंत ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. पण त्याचवेळी बेंगलोरला एकही विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. या दोन्ही संघांकडून न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम खेळला आहे. त्यामुळे त्याने या दोन संघातील फरक सांगितला आहे.
मॅक्यूलम म्हणाला, दोन्ही संघांच्या कर्णधारांचा दृष्टीकोन कमालीचा चांगला आहे. ज्यामुळे संघात उर्जा निर्माण होते. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आहे आणि बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मॅक्यूलम म्हणाला, ‘एक संघ निवड, विश्वास आणि काम करण्यास प्राधान्य देतो तर दुसरा संघ परिपूर्ण दिसत आहे पण त्यांच्याकडे कसे खेळायचे याची ब्ल्यू प्रिंट नाही. सीएसके आपल्या आसपास खूप आवाज होऊ देत नाही. तर आरसीबीच्या आसपास खूप आवाज असतो.’
याआधी सीएसकेकडून खेळणारा एल्बी मॉर्केलने धोनीचे कौतुक करताना म्हटले होते की ‘त्याची भूमिका मोठी आहे. आपण सगळे जाणतो की तो भारतात किती महान आहे. तो मर्यादीत षटकांचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तो एक खेळाडू म्हणून आणि तो कर्णधार म्हणून उत्तम आहे.’
तसेच मॉर्केल सीएसकेच्या यशाचे कारण सांगताना म्हणाला, ‘दीर्घकाळासाठी खेळाडूंना बांधून ठेवल्याने हे शक्य झाले आहे. सर्व मोसमांसाठी धोनी संघाचा कर्णधार होता आणि खूप कमीवेळा संघात मोठा बदल झाला आहे. याचकारणामुळे चेन्नई १० पैकी ८ वेळ अंतिम सामन्यात पोहचली आहे.’
ट्रेंडिंग घडामोडी –
वेळच अशी आलीय की २४ शतकं केलेला हा खेळाडूही करतोय टाॅयलेट साफ
–टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब
टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी