पुणे (1 एप्रिल 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज रेलीगेशन फेरीचे प्रत्येक संघाचे 6 सामने पूर्ण झाल असून सर्व संघाचे रेलीगेशन मध्ये 1 सामना बाकी आहे. गुणतालिकेत नाशिक व रायगड संघ 32 गुणांसह टॉप 2 मध्ये आहेत. उर्वरित 6 संघाच्या टॉप 2 मध्ये येण्याचा आशा संपुष्टात आल्या आहेत. रेलीगेशन मध्ये रायगड व नाशिक हे आपले शेवटचे सामने किती गुणांनी जिंकतात ह्यावरून त्यांची क्रमवारी ठरणार आहे.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात नाशिक संघाने जालना संघावर 53-14 अशी मात देत रेलीगेशन फेरीतील पाचवा विजय मिळवला. नाशिक संघाकडुन आज शिवकुमार बोरगुडे ने सर्वाधिक 12 गुण मिळवले. ऋषिकेश गडाख ने चढाईत 7 गुण मिळवले. शशिकांत बरकांड ने अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. तर गणेश गीते ने पकडीत 5 गुण व सिद्धांत संदनशिव ने 3 गुण मिळवले. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात रायगड संघाने 67-14 असा धाराशिव संघावर विजय मिळवला. रायगड संघाकडून प्रशांत जाधव ने एक उत्कृष्ट खेळी खेळली. प्रशांत जाधव ने चढाईत एकूण 19 गुण मिळवले. तर निखिल शिर्के व अविष्कार पाटील ने चढाईत प्रत्येकी 7 गुण मिळवले. राज मोरे व निशांत म्हात्रे यांनी बचावात उत्कृष्ट खेळ करत प्रत्येकी 6 गुण मिळवले.
आज झालेल्या तिसऱ्या लढतीत लातूर संघाने नांदेड संघावर 35-30 असा विजय मिळवला. लातूर संघाकडून प्रदिप आकांगिरे अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. अजिंक्य कटले ने चढाईत 6 गुण मिळवले. रोहित पवार ने पकडीत 5 गुण मिळवले. नांदेड कडून आर्यन धावले ने सर्वाधिक 13 गुण मिळवले. आज शेवटचा सामना अटीतटीचा झाला. शेवटच्या चढाईत धुळे संघाने बाजी मारत 30-29 असा सातारा संघावर विजय मिळवला. धुळे कडून जैवर्धन गिरासे व अक्षय पाटील ने चढाईत प्रत्येकी 9 गुण मिळवले. सातारा कडून यश निकम ने उत्कृष्ट खेळ करत 9 गुण मिळवले.
रेलीगेशन फेरी गुणतालिका.
1. नाशिक – 32 गुण (6 सामने)
2. रायगड – 32 गुण (6 सामने)
3. धुळे – 25 गुण (6 सामने)
4. जालना – 19 गुण (6 सामने)
5. नांदेड – 14 गुण (6 सामने)
6. लातूर – 10 गुण (6 सामने)
7. सातारा – 9 गुण (6 सामने)
8. धाराशिव – 3 गुण (6 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
अटीतटीच्या लढतीत धुळे संघाचा विजय, तरीही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
रेलीगेशन फेरीत रायगड संघाचा सलग पाचवा विजय
रेलीगेशन फेरीत लातूर संघाची नांदेड संघावर मात