टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत असे अनेक फलंदाज झाले आहेत, ज्यांनी स्फोटक डाव खेळला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल, आंद्रे रसेल, हार्दिक पांड्या, एबी डिव्हिलियर्स, ख्रिस लिन, जॉनी बेअरस्टो, रोहित शर्मा, युवराज सिंग आणि किरोन पोलार्ड या खेळाडूंना या स्वरूपात तज्ञ मानले जाते. या फलंदाजांनी टी-२० मध्ये अनेक जबरदस्त खेळी केल्या आहेत.
या स्वरुपात फलंदाज चौकार आणि षटकार ठोकले आणि कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे टी-२० हा क्रिकेट प्रकार चाहत्यांना खूप आवडतो. टी-२० स्वरूपात जास्त चौकार पाहायला मिळतात आणि चाहत्यांचे पूर्ण मनोरंजन होते. फलंदाजही वेगवान धावा करण्यासाठी षटकारांवर अधिक भर देतात. टी-२० विश्वचषकातही अनेक फलंदाजांनी बरेच षटकार मारले आहेत. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांविषयी आम्ही आपल्याला सांगत आहोत.
३. विराट कोहली
या यादीमध्ये तिसर्या क्रमांकावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहलीला क्रीजवर आल्यानंतर सेट होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र, त्यानंतर जेव्हा आवश्यक असेल तेव्हा त्याने धावफलक खूप वेगात हलविला आहे. विराट कोहलीने २०१२ ते २०१६ या कालावधीत टी-२० विश्वचषकात एकूण १६ सामने खेळले आहेत आणि यावेळी त्याने जबरदस्त फटकेबाजी केली आहे. १६ सामन्यात १९ षटकार त्याने मारले आहेत. तसेच एकूण ७७७ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १३३.०४ आहे.
२. रोहीत शर्मा
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा भाग होता. त्या स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली. २००७ ते २०१६ पर्यंत टी-२० विश्वचषकामध्ये त्याने २८ सामने खेळला आहे. या दरम्यान रोहित शर्माने २५ डावांमध्ये २४ षटकार मारले आहेत. रोहित शर्माने टी-२० विश्वचषकामध्ये ६७३ धावा केल्या असून, या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १२७.२२ आहे.
१. युवराज सिंग
२००७ मध्ये जेव्हा भारतीय संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. तेव्हा त्यामध्ये युवराज सिंगचे योगदान सर्वात महत्त्वाचे होते. त्या विश्वचषकात युवराज सिंगने अनेक अविस्मरणीय डाव खेळत भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. २००७ मध्ये पहिल्या टी-२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार ठोकण्यासाठी तो ओळखला जातो.
युवराज सिंग हा फलंदाज आहे टी-२० विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. २००७ ते २०१६ या कालावधीत भारताकडून टी -२० वर्ल्डकपमध्ये त्याने एकूण ३१ सामने खेळले आणि या काळात ३३ षटकार मारले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकापुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, संघनायक गंभीर जखमी; २ मालिकेतून बाहेर
तिन्ही वनडेत संधी मिळूनही केल्या फक्त ७४ धावा, भारताच्या ‘या’ फलंदाजांची वनडे कारकिर्द संपुष्टात?
विराटची वाढली चिंता! ‘हा’ प्रमुख खेळाडू होऊ शकतो आयपीएलमधून बाहेर