---Advertisement---

तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेटमध्ये घडला असा दुर्मिळ पराक्रम

---Advertisement---

ढाका। बांगलादेश विरुद्ध विंडीज संघात शुक्रवारपासून (30 डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात क्रिकेटमधील दुर्मिळ गोष्ट पहायला मिळली आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला त्यांच्या फलंदाजांनी योग्य ठरवताना पहिल्या डावात सर्वबाद 508 धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या विंडीज संघाची कामगिरी अंत्यत खराब झाली. त्यांनी 12 षटकातच 29 धावात 5 विकेट्स गमावल्या.

विशेष म्हणजे विंडीजचे हे पहिले पाचही फलंदाज त्रिफळाचीत झाले आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 128 वर्षांनतर अशी घडना घडली आहे.

तसेच कसोटी सामन्यात एका डावात एखाद्या संघाचे पहिले पाचही फलंदाज त्रिफळाचीत होण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे. याआधी 1879 आणि 1890  मध्ये असा पराक्रम कसोटी क्रिकेटमध्ये घडला होता.

विंडीजच्या या पाच फलंदाजांपैकी किरॉन पॉवेल, शाय होप आणि रोस्टन चेसला बांगलादेशच्या मेहदी हसनने त्रिफळाचीत केले, तर विंडीजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि सुनील अँब्रीस या दोघांना शाकिब अल हसनने त्रिफळाचीत केले आहे.

Photo Courtesy: Screengrab/icc-cricket.com

विंडीजला या पाच विकेट झटपट गेल्यानंतर सावरता आले नाही. त्यांचा पहिला डाव 111 धावांवरच संपुष्टात आला. विंडीजकडून फक्त शिमरॉन हेटमेयर(39) आणि शेन डॉवरिचने(37) थोडीफार लढत दिली.

त्यांच्या अशा कामगिरीमुळे बांगलादेशने विंडीजला फॉलोआॅन दिला आहे.

तत्पुर्वी बांगलादेशच्या फलंदाजांनीही या सामन्यात एक खास विक्रम केला आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावात एकही फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झालेला नाही. संघातील सर्व 11 फलंदाजांनी किमान दोन आकडी धावसंख्या गाठली आहे.

एका डावात एका संघाच्या सर्व 11 फलंदाजांनी किमान दोन आकडी धावसंख्या गाठण्याची ही एकूण 14 वी वेळ आहे. तर बांगलादेश संघाच्या बाबतीत असे पहिल्यांदाच घडले आहे.

याआधी अशी शेवटची घटना जानेवारी 2016 मध्ये जाहार्न्सबर्ग येथे दक्षिण अफ्रिका विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात घडली होती.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: भारत-बेल्जियम संघात रंगणार ‘कांटे की टक्कर’

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment