साल 2020 मध्ये कोरोनाचा हाहाकार सर्वत्र पाहायला मिळाला. त्यामुळे सर्व जग काही काळासाठी स्तब्ध झाले होते. त्यानंतर पुन्हा हळू हळू क्रिकेटच्या सामन्याचे आयोजन पुन्हा करण्यात येवू लागले. तरी सुद्धा खूप कमी क्रिकेटचे सामने या वर्षात बघायला मिळाले. सर्वात पहिल्यांदा इंग्लंड संघाने कोरोनाच्या विश्रांतीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
त्यामुळे यंदा सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाज आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळाला. मागील लेखामधून आपण कसोटी क्रिकेटमध्ये 2020 मध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणार्या टॉप सिक्स गोलंदाजाबद्द्ल जाणून घेतले होते. मात्र या लेखामधून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त धावा करणार्या टॉप 5 फलंदाजाबद्दल जाणून घेणार आहोत.
1. बेन स्टोक्स
साल 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स पहिल्या स्थानी आहे. बेन स्टोक्सने 2020 मध्ये 7 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 50.27 सरासरीने सर्वाधिक 641 धावा केल्या आहेत. यामधे त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 11 षटकार आणि 69 चौकार ठोकले आहेत.
2. डोम सिबले
कसोटी क्रिकेटमध्ये 2020 साली सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसर्या क्रमांकावर इंग्लंडचा डोम सिबले हा फलंदाज आहे. डोम सिबलेने 2020 मध्ये 9 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 615 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याची सरासरी 47.30 ची होती. या उजव्या हाताच्या फलंदाजाने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.
3. जॅक क्राॅले
साल 2020 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणार्या यादीत इंग्लंडचा युवा फलंदाज जॅक क्राॅले हा तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने यंदा 7 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 52.37 च्या सरासरीने 580 धावा काढल्या आहेत. त्याने 297 धावांची खेळी सुद्धा केली आहे. त्याचबरोबर जॅक क्राॅलेने 3 अर्धशतके लगावली आहेत.
4. केन विलियम्सन
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन हा कसोटीत 2020 या वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये एकमात्र न्यूझीलंड संघाचा फलंदाज आहे. त्याने 4 कसोटी सामने खेळले आहेत. यामधे त्याने 83 च्या सरासरीने 498 धावा काढल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 1 अर्धशतक केले आहे. त्यापैकी त्याची सर्वोत्तम 251 धावांची खेळी आहे.
5. जोस बटलर
कसोटी क्रिकेटमध्ये 2020 साली सर्वात जास्त धावा करणार्या यादीत इंग्लंडचा जोस बटलर हा पाचव्या स्थानी आहे. त्याने 9 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 38.23 च्या सरासरीने 497 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
गुडबाय २०२० : यावर्षी कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे ‘हे’ आहेत ६ गोलंदाज
क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! २०२१ मध्ये टीम इंडिया खेळणार ‘एवढ्या’ मालिका
गुडबाय २०२०: धोनी-रैनासह या ५ दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर्षी घेतली निवृत्ती