Indian batsman who scored the fastest century in Test cricket: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद शतक करण्याचा रेकाॅर्ड माजी भारतीय फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर आहे. अझरुद्दीनने हा पराक्रम सुमारे 29 वर्षांपूर्वी केला होता. अझरुद्दीनचा हा रेकाॅर्ड अद्याप कोणताही भारतीय फलंदाज मोडू शकलेला नाही. विशेष म्हणजे, भारतासाठी कसोटीमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या खेळाडूंच्या टॉप-5 यादीत, दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नावाचा समावेश नाही. त्याचबरोबर, सध्या धडाकेबाज फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल देखील या यादीत नाही. (Fastest Test century for India)
कसोटीमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक करणारे टॉप-5 फलंदाज
1) मोहम्मद अझरुद्दीन- भारतासाठी सर्वात जलद शतक करण्याचा रेकाॅर्ड मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर आहे. अझरुद्दीनने 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे केवळ 74 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. (Mohammad Azharuddin Test century record)
2) वीरेंद्र सेहवाग- माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेहवागने ग्रोस आयलेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 78 चेंडूंमध्ये शतक ठोकून इतिहास रचला होता. (Virender Sehwag fastest Test hundred)
3) शिखर धवन- माजी भारतीय फलंदाज शिखर धवन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. धवनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 85 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. (Shikhar Dhawan Test record)
4) कपिल देव आणि हार्दिक पांड्या- या यादीत कपिल देव आणि हार्दिक पांड्या संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांनी 1982 मध्ये इंग्लंडविरुद्ध 86 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. तर हार्दिकने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 86 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. (Hardik Pandya Kapil Dev fastest century)
5) सेहवाग आणि धवन- या यादीत पाचव्या क्रमांकावर सेहवाग आणि धवन संयुक्तपणे आहेत. सेहवागने 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर धवनने 2018 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केवळ 87 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. (Virender Sehwag And Shikhar Dhawan Fastest Century)






