सध्या जगभरात अनेक टी20 लीग खेळल्या जातात. कारण टी20 क्रिकेटचा दर्जा खूप वरपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत अनेक फलंदाजांनी आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने टी20 मध्ये वर्चस्व गाजवले आहे. त्यामध्ये ख्रिस गेल, रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह अनेक युवा फलंदाजांचा समावेश आहे. मात्र, टी20 सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड भारताच्या युवा खेळाडूच्या नावावर आहे. या बातमीद्वारे आपण टाॅप-5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी टी20च्या एका डावात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
1) आयुष बदोनी- टी20 डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्ड भारतीय फलंदाज आयुष बदोनीच्या नावावर आहे. दिल्ली प्रीमियर लीग 2024चा 23वा सामना पश्चिम दिल्ली लायन्स आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात खेळला गेला. दक्षिण दिल्लीचा कर्णधार आयुषनं शानदार फलंदाजी करत 55 चेंडूत 8 चौकार आणि 19 षटकारांसह 165 धावा केल्या.
2) खिस गेल- 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये रंगपूर रायडर्स संघाचा भाग होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यानं ढाका डायनामाईट्सच्या गोलंदाजांचा पराभव केला. या सामन्यात गेलनं 69 चेंडूंचा सामना करत नाबाद 146 धावा केल्या. दरम्यान त्यानं 5 चौकार आणि 18 षटकार मारले होते.
3) साहिल चौहान- जून 2024 मध्ये एस्टोनिया आणि सायप्रस यांच्यात झालेल्या टी20 सामन्यात साहिल चौहाननं थरारक फलंदाजी केली. या एस्टोनियन फलंदाजानं या सामन्यात केवळ 41 चेंडूंचा सामना करत नाबाद 144 धावा केल्या होत्या. साहिलनं 6 चौकार आणि 18 षटकार मारले होते.
4) ख्रिस गेल- युनिव्हर्स बॉस म्हणजेच ख्रिस गेलची गणना जगातील धोकादायक फलंदाजांमध्ये केली जाते. आयपीएल 2013 मध्ये, आरसीबीकडून खेळताना, त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध 66 चेंडूत नाबाद 175 धावा केल्या होत्या, ज्यात 13 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता.
5) पुनीत बिष्ट- भारताचा फलंदाज पुनीत बिश्त या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 2021 मध्ये खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने मिझोरामविरुद्ध शानदार फलंदाजी केली. या सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत 51 चेंडूत नाबाद 146 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 17 षटकारांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या-
BAN vs PAK: बाबर आझम पुन्हा ढेपाळला, चाहत्यांनी दिला निवृत्तीचा सल्ला
Champion’s Trophy: हरभजन सिंगचे बदलले मत, आता म्हणाला, “भारताने पाकिस्तानमध्ये…”
VIDEO; बाऊन्सरच्या फटक्यात कोसळला ‘हा’ पाकिस्तानी खेळाडू