1. सचिन तेंडुलकर: क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने वयाच्या 16 व्या वर्षी 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तान विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला आणि आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले.
पहिल्याच सामन्यात जेव्हा वकार युनुसचा चेंडू नाकाला लागुनही त्याने खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्याच्यातली क्रिकेट खेळण्याची जिद्द सर्वांना पहायला मिळाली.
नंतर या खेळाडूने 24 वर्ष त्याच्या अफलातून फलंदाजीने सर्वांनाच भूरळ घातली. या 24 वर्षांच्या कारकिर्दीत त्याने सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळताना 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या.
यात त्याने 51 शतके करतानाच कसोटीत 50 पेक्षा जास्त शतके करणारा पहिलाच फलंदाज बनण्याचा मानही मिळवला.
सचिनने शेवटचा सामना त्याच्या घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर 14 ते 16 नोव्हेंबर 2013ला खेळला.
2. रिकी पाँटिंग: आॅस्ट्रेलियाचा महान कर्णधार आणि खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिकी पाँटिंगने कसोटीत पर्थमध्ये श्रीलंके विरुद्ध 8 डिसेंबर 1995 ला पदार्पण केले.
पाँटींगची कसोटी क्रिकेटची सुरवात चांगली झाली होती. पहिल्याच कसोटीत पाँटींगने 96 धावा केल्या. त्याचे शतक 4 धावांनी थोडक्यात हुकले.
पंटर असे टोपननाव असणाऱ्या या खेळाडूने 17 वर्षांच्या कारकिर्दीत 168 सामन्यात 58.72 च्या सरासरीने 13378 धावा केल्या. यात त्याने 41 शतके आणि 62 अर्धशतके केली.
पाँटींगने वयाच्या 37 व्या वर्षी पर्थमध्येच 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2012 दरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला. निवृत्तीनंतर त्याने समालोचन आणि प्रशिक्षक म्हणून काम करणे पसंत केले आहे.
3. जॅक कॅलिस: दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू जॅक कॅलिसने कसोटी क्रिकेटमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तो जरी अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्याला सर्वोत्तम फलंदाज म्हणूनही नावाजले गेले.
कॅलिसने 14 डिसेंबर 1995 ला वयाच्या 20व्या वर्षी इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. या सामन्यात कॅलिसला खास काही करता आले नाही. त्याला 1 धावेवर पीटर मार्टीनने बाद केले.
मात्र त्यानंतर त्याने त्याच्या सातव्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. कॅलिसने त्याच्या 18 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत 166 सामने खेळले. यात त्याने सचिन पाठोपाठ सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही केला.
कॅलिसने कसोटीत 45 शतके आणि 58 अर्धशतकांसह 55.37 च्या सरासरीने 13289 धावा केल्या. याशिवाय कॅलिसने 250 पेक्षा जास्त विकेटही घेतल्या. त्याने शेवटचा कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर 2013 दरम्यान भारताविरुद्ध खेळला.
4. राहुल द्रविड: ‘द वॉल’ अशी ओळख असणारा राहुल द्रविड कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
शांततेत आणि चिकाटीने खेळणाऱ्या या खेळाडूने त्याचा पहिला कसोटी सामना 20 जूनला लॉर्डसवर इंग्लंड विरुद्ध खेळला. या सामन्यात त्याचे शतक थोडक्यात हुकले. त्याला 95 धावांवर ख्रिस लेविसने बाद केले.
फलंदाजीतील चिकाटीमुळे त्याला ‘जॅमी’ हे टोपननाव पडलेल्या द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 164 सामन्यात खेळताना 52.31 च्या सरासरीने 13288 धावा केल्या. यात त्याने 36 शतके आणि 63 अर्धशतके केली.
याबरोबरच द्रविड भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. नेहमीच संघाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदीरी पार पाडणाऱ्या द्रविडने आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेडला 24 ते 28 जानेवारी दरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला.
सध्या द्रविड 19 वर्षांखालील भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे. जानेवारी-फेब्रुवीरी २०१८मध्ये पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने विजेतेपद मिळवले आहे.
5. कुमार संगकारा: लॉचा अभ्यास करतानाच श्रीलंकेच्या कुमार संगकाराने क्रिकेटमध्येही उत्तम कारकिर्द घडवली. वयाच्या 22 व्या वर्षीच श्रीलंकेकडून संगकाराने कसोटी पदार्पण केले. त्याने पहिला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 20 जुलै 2000ला खेळला.
संगकाराने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त चांगली फलंदाजीच नाही तर उत्कृष्ट यष्टीरक्षण आणि श्रीलंका संघाचे नेतृत्वही केले. संगकारा 15 वर्ष श्रीलंकेकडून कसोटी क्रिकेट खेळला.
या वर्षात त्याने 134 सामन्यात खेळताना 57.40 च्या सरासरीने 12400 धावा केल्या. यात त्याने 36 शतके आणि 52 अर्धशतके केली. 319 धावा ही त्याची कसोटीतील सर्वोच्च वयक्तिक धावसंख्या ठरली.
कसोटीत श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या संगकाराने त्याचा शेवटचा कसोटी सामना भारता विरुद्ध कोलंबो येथे 20 ते 24 आॅगस्ट 2015 दरम्यान खेळला. हा त्याचा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधीलही शेवटचा सामना ठरला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करुन मालामाल झालेले ५ अष्टपैलू
-आयुष्यात पहिल्यांदाच घेतलेली काॅफी पंड्याला पडली भलतीच महागात
-जर आयपीएल झाली नाही तर १० कोटींवर पाणी सोडावे लागणारे ५ खेळाडू