ऑलिम्पिक खेळांच्या इतिहासात कोणत्या देशानं सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकली आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तसेच, सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रम कोणत्या देशाच्या नावावर आहे? नाही ना. चला तर मग, या बातमीद्वारे हे जाणून घेऊया.
ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकण्याच्या यादीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. विशेष म्हणजे, या बाबतीत अमेरिकेच्या आसपासही कोणीच नाही. अमेरिकेच्या नावावर ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक 1065 सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम आहे. 1 हजाराहून अधिक सुवर्णपदकं जिंकणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. याशिवाय अमेरिकेनं 835 रौप्य आणि 738 कांस्यपदकं जिंकली आहेत. अशा प्रकारे अमेरिकेनं एकूण 2638 पदकं जिंकली आहेत.
सोव्हिएत युनियन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. सोव्हिएत युनियननं ऑलिम्पिक इतिहासात 395 सुवर्ण पदकांसह 1010 पदकं जिंकली आहेत. युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियननंतर ग्रेट ब्रिटन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत, ग्रेट ब्रिटन 285 सुवर्ण पदकांसह ऑलिम्पिक स्पर्धेत तिसऱ्या स्थानावर आहे. 285 सुवर्ण पदकांसह ग्रेट ब्रिटननं एकूण 918 पदके जिंकली आहेत. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या देशाची लोकसंख्या केवळ 7 कोटी आहे. मात्र ऑलिम्पिक खेळांमध्ये त्यांचा दबदबा दिसून आला आहे.
या देशांनंतर चौथ्या क्रमांकावर चीन आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात आतापर्यंत चीननं 262 सुवर्णपदकं जिंकली आहेत. यानंतर फ्रान्स पाचव्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात फ्रेंच खेळाडूंनी 223 सुवर्णपदके जिंकली आहेत. अशाप्रकारे, अमेरिकेशिवाय ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या देशांमध्ये सोव्हिएत युनियन, ग्रेट ब्रिटन, चीन आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतानं आतापर्यंत 35 ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय हॉकी संघानं विक्रमी 8 सुवर्ण पदकं जिंकली आहेत. तर अभिनव बिंद्रा आणि नीरज चोप्रा यांनी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं आहे. भारतानं आतापर्यंत एकूण 25 उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. भारताकडून एकूण 1,218 खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
फेडरर-नदालच्या मक्तेदारीला आव्हान देणाऱ्या दिग्गजाचा टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट
मेगा लिलावापूर्वी हैदराबादचा प्लॅन ठरला, 150चा स्पीड असणाऱ्या वेगवान गोलंदाजाला बसणार मोठा झटका!
बीसीसीआयनं चक्क दुसऱ्या देशाच्या टीमला दिले 3 ‘होम ग्राऊंड्स’, भारतात होणार कसोटी सामने