टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 9 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि आयर्लंडचे संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट मैदानावर आमनेसामने येतील. आज आपण पाकिस्तानच्या अशा 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे भारताविरुद्ध एकहाती सामना बदलू शकतात. टीम इंडियाला या 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागणार आहे.
बाबर आझम – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची गणना टी20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. त्यानं 119 टी20 सामन्यांमध्ये 41.05 ची सरासरी आणि 130.15 च्या स्ट्राइक रेटनं 3091 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये बाबर आझमनं 3 शतकं तर 36 अर्धशतकं झळकवली आहेत. याआधी, 2021 च्या टी20 विश्वचषकात बाबर आझमनं भारताविरुद्ध 52 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या होत्या.
फखर जमान – फखर जमानची गणना जागतिक क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांमध्ये केली जाते. याशिवाय फखर जमानचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनलमध्ये फखरनं शतक झळकावून सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकवला होता. फखर जमाननं आतापर्यंत 88 टी20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये त्यानं 23.57 ची सरासरी आणि 133.46 च्या स्ट्राइक रेटनं 1360 धावा केल्या आहेत.
शाहीन आफ्रिदी – शाहीन आफ्रिदी हा भारताच्या टॉप ऑर्डरसाठी मोठं आव्हान ठरू शकतो. तो जेव्हाही भारताविरुद्ध खेळतो, तेव्हा टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला अडचणी निर्माण करतो. विशेषत: भारतीय सलामीवीर त्याचे बळी ठरतात. त्यामुळे या सामन्यात भारतीय फलंदाजांना शाहीन आफ्रिदीचे नवीन चेंडू सावधपणे खेळावे लागतील. याशिवाय शाहीनचे या फॉरमॅटमधील आकडे कौतुकास्पद आहेत. नवीन चेंडूंव्यतिरिक्त त्यानं डेथ ओव्हर्समध्येही उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे.
मोहम्मद आमिर – पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. मोहम्मद आमिरनं 2016 टी20 विश्वचषक 2016 आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती. विशेषत: मोहम्मद आमीरच्या चेंडूंचं भारताच्या आघाडीच्या फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना टी20 विश्वचषकात त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे.
इफ्तिखार अहमद – इफ्तिखार अहमद टी20 विश्वचषकात पाकिस्तानी संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. हा खेळाडू फलंदाजीशिवाय गोलंदाजीतूनही योगदान देऊ शकतो. इफ्तिखार अहमदनं आतापर्यंत 64 टी20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे, ज्यामध्ये त्यानं 25.00 ची सरासरी आणि 130.00 च्या स्ट्राइक रेटनं 750 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत इफ्तिखार अहमदनं 7.04 इकॉनॉमी आणि 41.5 च्या सरासरीनं 8 बळी घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात मिळवून दिला एकहाती विजय! जाणून घ्या कोण आहे ॲरॉन जोन्स
अमेरिका-कॅनडाचा क्रिकेट इतिहास आहे 180 वर्ष जुना! ‘या’ वर्षी खेळला गेला होता पहिला सामना
अमेरिकेतही रोहित शर्माची क्रेझी फॅन फॉलोइंग! भेट घेण्यासाठी चाहता थेट घुसला मैदानात; पाहा VIDEO