आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये असे अनेक फलंदाज आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर खूप नाव कमावले आहे. कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीपासून असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी मोठमोठ्या गोलंदाजांविरूद्ध वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण अशा 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक सरासरीने धावा केल्या आहेत. या यादीत भारताच्या युवा स्टार खेळाडूचा देखील समावेश आहे.
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)- ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक मानला जातो. डॉन ब्रॅडमन (Don Bradman) हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम 99.94 सरासरी असलेला फलंदाज आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 52 सामन्यातील 80 डावात फलंदाजी करताना 13 अर्धशतकांसह 29 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याने 6,996 धावा ठोकल्या आहेत.
यशस्वी जयस्वाल (भारत)- भारतीय संघाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने कमी वेळात अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. कसोटीमध्ये 11 सामन्यातील 20 डावात 64.05च्या सरासरीने 1,217 धावा केल्या आहेत. त्याने 7 अर्धशतकांसह 3 शतके झळकावली आहेत, तर 1 द्विशतक देखील झळकावले आहे.
हॅरी ब्रूक (इंग्लंड)- इंग्लंडचा युवा फलंदाज ‘हॅरी ब्रूक’ने (Harry Brook) आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या चमकदार फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने आतापर्यंत कसोटीमध्ये 20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 62.50च्या सरासरीने 1,875 धावा केल्या आहेत.
ॲडम वोग्स (ऑस्ट्रेलिया)- ॲडम वोजेस (Adam Voges) हा ऑस्ट्रेलियाचा माजी सर्वोत्कृष्ट खेळाडू असून त्याने आपल्या दमदार खेळीने ऑस्ट्रेलियासाठी अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. वोग्सने ऑस्ट्रेलियासाठी फक्त 20 कसोटी सामने खेळले आहेत, परंतु या 20 सामन्यांमध्ये त्याची सरासरी खूप चांगली आहे. वोग्सने 20 सामन्यांच्या 31 डावांमध्ये 60.97च्या सरासरीने 1,485 धावा केल्या आहेत.
रिचर्ड पोलॉक (दक्षिण आफ्रिका)- दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ज्याने केवळ 23 कसोटी सामने खेळले, परंतु त्याने आपल्या मजबूत सरासरीने स्वतःचे नाव कमावले. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पोलॉकची सरासरी सर्वोत्तम आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 60.97 आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधील 23 सामन्यांच्या 41 डावांमध्ये 2,256 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिनेश कार्तिक पुन्हा करणार चौकार-षटकारांची आतषबाजी! नव्या लीगशी करार, राशिद खानचाही संघात समावेश
‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये एबी डिव्हिलियर्सचा समावेश, माजी भारतीय क्रिकेटपटूलाही मिळाला सन्मान
भारत-न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट, मालिका ड्रॉ झाल्यास कोणाचा फायदा? जाणून घ्या