---Advertisement---

वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी

On: सोमवार, एप्रिल 13, 2020 11:09 AM
---Advertisement---

वनडे क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी शतकांचा रतीब घातला आहे. त्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ४९ शतकांसह अव्वल स्थानी आहे. तर ४३ शतकांसह विराट दुसऱ्या स्थानावर आहे. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३०पेक्षा जास्त वनडे शतके करता आली नाहीत.

परंतु कर्णधार म्हणूनही काही खेळाडूंनी वनडेत जबरदस्त कामगिरी केली आहेत. त्यात ३९६ खेळाडूंपैकी ५ खेळाडूंना केवळ १० किंवा अधिक शतके करता आली आहेत. Top 5 players with most centuries as captain in ODIs.

५. सनथ जयसुर्या (१० शतके)

श्रीलंकेचा महान अष्टपैलू खेळाडू सनथ जयसुर्याने लंकेचे ११८ वनडे सामन्यात नेतृत्त्व केले. यातील ११८ पैकी ११८ डावात फलंदाजी करताना त्याने ३८.७३च्या सरासरीने ४३७७ धावा केल्या. यात त्याने १० शतके व २५ अर्धशतके केली आहेत.

४.  सौरव गांगुली (११ शतके)

भारतीय संघाचा दादा कर्णधार सौरव गांगुलीने १४७ वनडे सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले. यात १४३ डावांत फलंदाजी करताना ३८.६६च्या सरासरीने त्याने ५१०४ धावा केल्या. यात त्याच्या ११ शतके व ३० अर्धशतकांचा समावेश आहे.

३. एबी डिविलीयर्स (१३ शतके) 

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिविलीयर्सने १०३ वनडेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्त्व करताना ६३.९४च्या सरासरीने ४७९६ धावा केल्या. यात त्याने १३ शतके व २७ अर्धशतके केली आहेत. ९८ पैकी तब्बल ४० डावात त्याने ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत.

२. विराट कोहली (२३ शतके)

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीने ८९ सामन्यात भारताचे नेतृत्त्व केले आहे. यात त्याने ८५ डावात ७४.५९च्या सरासरीने ५१४७ धावा केल्या आहेत. या ८९ डावात फलंदाजी करताना त्याने २१ शतके व २३ अर्धशतके केली आहेत. ८९ डावातील ४४ डावात त्याने ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत.

१. रिकी पाॅटींग (२२ शतके)

वनडेत सर्वाधिक अर्थात २३० वनडे सामन्यात रिकी पाॅटींगला ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली. त्यात २२० डावात फलंदाजी करताना त्याने ४२.९१ सरासरीने ८४९७ धावा केल्या. यात त्याने २२ शतके व ५१ अर्धशतके केली आहेत. पाॅटिंगने ३० पैकी २२ शतके कर्णधार म्हणून केली आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू

-चहल म्हणतो, टीम इंडियाचे हे दोन शिलेदार बरोबर असतील तर महिनाभरही राहु शकतो लाॅकडाऊनमध्ये खुश

-जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स

-मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---