fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

जगातील ५ महान गोलंदाज, जे कधीही घेऊ शकले नाहीत वनडेत ५ विकेट्स

जसे क्रिकेटमध्ये शतकाला महत्त्व असते तसे ५ विकेट्स घेण्यालाही तितकेच महत्त्व असते. त्यातही वनडेत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करणे अवघडच. अगदी शेन वॉर्नसारख्या गोलंदाजालाही अशी कामगिरी केवळ एकदाच करता आली आहे. पण असेही काही दिग्गज गोलंदाज आहेत ज्यांनी अनेक मोठे पराक्रम केले, पण त्यांना वनडेत ५ विकेट्स घेण्याची कामगिरी करता आली नाही.

या ५ महान गोलंदाजांना घेता आले नाहीत वनडेत ५ विकेट्स –

१. बॉब विलिस –

इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज बॉब विलिस यांनी अनेक मोठे विक्रम केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा अधिक विकेट्सही घेतल्या आहेत. यातील ८० विकेट्स त्यांनी ६४ वनडे सामन्यात खेळताना घेतल्या आहेत.

त्यांनी ६४ वनडेत ४ वेळा ४ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्यांनी १९७९ मध्ये कॅनडा विरुद्ध ११ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्यांनी वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. मात्र त्यांना ५ विकेट्सची कामगिरी एकदाही करता आली नाही.

२. इयान बॉथम –

इंग्लंडचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी ११६ वनडेत २११३ धावांशिवाय १४५ विकेट्सही घेतल्या आहेत. यातील तीन वेळा त्यांनी ४ विकेेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी १९९२ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे ३१ धावांत ४ विकेट्स घेतल्या आहेत. ही त्यांनी वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. मात्र असे असतानाही त्यांना एकदाही वनडेत ५ विकेट्स घेता आलेले नाही.

३. जेफ थॉम्पसन –

शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण करण्यापूर्वी जेफ थॉम्पसन सर्वात वेगवान गोलंदाज मानले जात होते. त्यांनी २०० कसोटी विकेट्स घेण्याबरोबच ५० वनडे सामन्यात ५५ विकेट्स घेतल्या आहेत.

यातील १९७८ ला त्यांनी त्यावेळच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ६७ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यांना कधीही वनडेत ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेता आल्या नाही.

४. माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचे दिग्गज गोलंदाज माल्कम मार्शल यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यातील १५७ विकेट्स त्यांनी वनडेत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी १३६ वनडे सामन्यात ६ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मात्र त्यांना एकदाही ५ विकेट्स वनडेत घेता आलेले नाही.

त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९९१ ला मेलबर्न येथे १८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्यांची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

५. आर अश्विन –

भारताचा फिरकीपटू आर अश्विनने कसोटीत ३६५ विकेट्स तर वनडेत १५० विकेट्स घेतल्या आहेत. ३० जून २०१७ ला वेस्ट इंडिज विरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या अश्विनने त्याच्या कारकिर्दीत एकूण १११ वनडे सामने खेळले आहेत.

यामध्ये त्याने १ वेळा ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. ही कामगिरी त्याने २०१५ च्या विश्वचषकात पर्थ येथे खेळताना संयुक्त अरब अमिराती विरुद्ध केली होती. त्याने २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

मुंबई ड्रीम ११ टीम इंडियाच्या ऑल टाईम ११पेक्षाही भारी, पहा टीम

तब्बल ३ वर्ष व ७० वनडेनंतर त्या खेळाडूने केली होती शतकी खेळी

गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर

You might also like