इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने ११ सप्टेंबर २०१८ रोजी भारताविरुद्ध ओव्हल येथे कारकिर्दीतील १६१वा व शेवटचा सामना खेळला. विशेष म्हणजे त्याने 1-5 मार्च 2006 दरम्यान नागपूर येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातूनच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.
कूकने १३ वर्षे इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. या काळात त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहेत हे खास विक्रम-
-कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याने 30 वर्षे 5 महिने आणि 5 दिवसांचा असताना कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला. हा विक्रम त्याने 30 मे 2016 ला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केला होता.
-अॅलिस्टर कूक हा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक वेळ फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अबुधाबी येथे 13 आॅक्टोबर 2015 ला पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 836 मिनिटे फलंदाजी केली होती. या यादीत हानिफ मोहम्मद आणि गॅरी कर्स्टन अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.
-कूकने त्याच्या कारकिर्दीत सलग १५९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामुळे त्याने सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
त्याने त्याच्या कारकिर्दीत १६१ कसोटी सामने खेळले आहेत. यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर आजारी असल्याने तो एका सामन्याला मुकला होता. त्यानंतर मात्र तो कधीही कसोटी सामन्यांना मुकला नाही.
विशेष म्हणजे कूकच्या पदार्पणानंतर इंग्लंडने आत्तापर्यंत १६२ कसोटी सामने खेळले आहेत. यातील १६१ सामन्यात कूकचा समावेश होता.
-कूक हा कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने १६१ कसोटी सामन्यात ४५.३५ च्या सरासरीने १२४७२ धावा केल्या आहेत.
– इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही कूकच्या नावावर आहे.
-तसेच कूक हा कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या एकूण खेळाडूंमध्ये 10 व्या क्रमांकावर असून इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये तो अव्वल क्रमांकावर आहे.
-कूकने इंग्लंडचे 2010 ते 2016 दरम्यान नेतृत्व केले असून तो इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटीत नेतृत्व करणारा कर्णधार आहे. तो 59 कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार होता.
सर्वाधिक हिट्स मिळालेले लेख
–हे ५ खेळाडू संघात असले म्हणजे सामना टाय व्हायचे चान्सेस वाढलेच समजा
–विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं
–१९८३ व २०११ क्रिकेटविश्वचषकाच्या बक्षीसाच्या रकमा आहेत विचार करायला लावणाऱ्या
–क्रिकेट विश्वविजेत्या भारताच्या ट्राॅफी नक्की आहेत तरी कुठं?
– असा आहे विश्वचषकात विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या ट्राॅफीचा इतिहास