दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू हर्षल गिब्जने 2007 विश्वचषकात आजच्याच दिवशी 6 षटकार मारले होते. नेदरलॅंडविरुद्ध खेळताना त्याने ही कामगिरी केली होती. या कामगिरीला आज 13 वर्ष पुर्ण होत आहे.
हर्षल गिब्जच्या आधी आणि नंतरही काही क्रिकेटपटूंनी प्रथम श्रेणी तसेच अ दर्जाच्या सामन्यांत 6 चेंडूत 6 षटकार मारले आहेत.
अशी कामगिरी यापुर्वी गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, हजरतुल्ला झझाइ आणि रॉस व्हिटली यांनी केली आहे.
या खेळाडूंपैकी फक्त युवराज सिंग आणि हर्षल गिब्स यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
विशेष म्हणजे या दोघांनीही 2007 मध्ये हा विक्रम केला आहे. फक्त गिब्स यांनी वनडे विश्वचषकात तर युवराजने टी20 विश्वचषकात ही कामगिरी केली आहे.
तसेच इन्झमाम-उल-हक, अॅलेक्स हेल्स आणि रविंद्र जडेजा यांनीही सलग 6 चेंडूत 6 षटकार मारले आहेत. परंतू त्यांनी एकाच षटकात हा पराक्रम केलेला नाही.
एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारणारे खेळाडू-
1968 – गॅरी सोबर्स
1985 – रवी शास्त्री
2007 – हर्षल गिब्स
2007 – युवराज सिंग
2017 – रॉस व्हिटली
2018 – हजरतुल्ला झझाइ
ट्रेंडिंग घडामोडी-
–युवराज आधी या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात मारले होते ६ षटकार
– कोरोनाचा फटका टीम इंडियाच्या आयसीसी वनडे क्रमवारीलाही?
– टीम इंडियाचा सदस्य नसलेला धोनी खेळतोय हा खेळ
– जड्डूला सर म्हटल्यावर नक्की वाटतं तरी काय?