कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोक त्रस्त आहेत. त्याचबरोबर क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे की दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्स केव्हा कमबॅक करेल? कारण डिविलियर्स यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० विश्वचषकात खेळताना दिसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
यादरम्यान डिविलियर्सने (AB De Villiers) खेळाडूंवर असलेल्या कामाच्या ताणाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्याचे असे म्हणणे आहे की, कामाच्या ताणावरील निर्णय हा खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे.
परंतु त्याचबरोबर डिविलियर्सचा असा विश्वास आहे की, संघातील अव्वल खेळाडूंना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जास्त थकवा येत असतो.
“प्रत्येक खेळाडूने आपली स्थिती पाहिली पाहिजे आणि आपले निर्णय घेतले पाहिजेत. मी आयुष्यातील अशा स्थितीमध्ये गेलो होतो, जेव्हा मला माझ्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना पहायचे होते. तसेच परिवार आणि क्रिकेटमध्ये एक समतोल राखायचा होता,” असे डिविलियर्स यावेळी म्हणाला.
“या वेळी अव्वल खेळाडूंकडून अधिक अपेक्षा केली जाते. परंतु प्रत्येक खेळाडूने आपला निर्णय घेतला पाहिजे की तो काय करू शकतो आणि काय नाही,” असेही खेळाडूंबद्दल बोलताना डिविलियर्स म्हणाला.
डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले होते पंरतु तो अनेक देशांंमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमध्ये खेळत होता. या दरम्यान ३६ वर्षांचा झाल्यानंतरही त्याचा फीटनेस असा आहे की युवा खेळाडूंनाही लाज वाटेल. परंतु डिविलियर्ससाठी ही एक शिस्त आहे.
“शिस्त ही गुरुकिल्ली आहे. योग्य आहार घेणे आणि व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. ही आता एक सवय होऊन जाते. यात अवघड असे काही नाही,” असे शिस्तीबद्दल बोलताना डिविलियर्स म्हणाला.
डिविलियर्सने खास गोष्टी सांगितले की, तो गोष्टी आरामात घेत आहे. तसेच त्याने २०१८ आयपीएलनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी डिविलियर्स म्हणाला होता की, तो तेव्हाच निवृत्ती घ्यायचे होते, जेव्हा तो चांगल्याप्रकारे क्रिकेट खेळत असेल.
तेव्हा त्याला व्यस्त वेळापत्रकामुळे खूप थकवा येत होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीदेखील (Virat Kohli) नुकताच अशा प्रकारच्या थकव्याबद्दल बोलला होता.