जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये आपल्या आग ओकणाऱ्या चेंडूंनी कहर करतो. 2024 टी20 विश्वचषकात बुमराहनं टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली होती. बुमराहसमोर मोठमोठ्या फलंदाजांची भंबेरी उडते. परंतु जसप्रीत बुमराहसाठी गोलंदाजी करायला कठीण वाटणारा असा कोणी फलंदाज आहे का? तर खुद्द बुमराहनं या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
बुमराह नुकताच चेन्नईतील एका महाविद्यालयीन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. येथे त्याला गोलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण फलंदाज कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. बुमराहला विचारण्यात आलं की, तुला गोलंदाजी करायला सर्वात कठीण फलंदाज कोण आहे? यावर बुमराहनं असं उत्तर दिलं, ज्यामुळे सर्वांचीच मन जिंकली.
बुमराह म्हणाला, “मला चांगलं उत्तर द्यायचं आहे. खरी गोष्ट अशी आहे की, मला वाटतं माझ्यावर कोणीही वर्चस्व गाजवू नये. मी सर्वांचा आदर करतो, पण मनात मी स्वतःला सांगतो की, जर मी माझं काम चांगलं केलं मला कोणीच रोखू शकत नाही. मी विरोधी फलंदाजाऐवजी स्वत:कडे पाहतो. माझं स्वत:वर नियंत्रण आहे. जर मी स्वतःला सर्वोत्तम संधी दिली तर सगळ्या गोष्टी आपोआप ठीक होतील.”
जसप्रीत बुमराह टी20 वर्ल्ड कप 2024 नंतर विश्रांतीवर आहे. टी20 विश्वचषकानंतर टीम इंडियानं झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा दौरा केला. या दोन्ही दौऱ्यांसाठी बुमराह भारतीय संघात नव्हता. आता टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही बुमराह विश्रांतीवर असेल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा –
लज्जास्पद! विदेशात खेळायला गेलेले 3 पाकिस्तानी खेळाडू मायदेशी परतलेच नाहीत
जो रुटनं आणखी एक शतक ठोकून मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड! कोहली अजूनही कोसो दूर
टी20 विश्वचषकादरम्यान रोहित आणि हार्दिकमधील वाद कसा संपला? खास व्यक्तीचा उलगडा