भारताचा सण समजल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमीयर लीग 2023 या स्पर्धेच्या तयारीला सुरूवात झाली आहे. आयपीएलचा लिलाव डिसेंबरच्या सुरूवातीला होणार असून संघांतर्गत ट्रेडिंग सुुरू झाली आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन आणि अफगणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज रेहमानउल्लाह गुरबाझ यांना कोलकाता नाईट रायडर्स या संघाला ट्रेड केले (खेळाडूंची अदलाबदली) आहे.
लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) याला गुजरात टायटन्स संघाने या वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलच्या लिलावात 10 काेटी रूपयांना खरेदी केले होते. न्यूझीलंडच्या या खेळाडू्ने संंघासाठी 13 सामन्यात 12 विकेट्स मिळवल्या ज्यात एका 4 विकेट हॉल देखील सामील आहे. हा वेगवान गोलंंदाज या आधी 2017 ते 2021 पर्यंत कोलकाता नाईट रायडर्स या संघात खेळलेला आहे. त्याचबरोबर रेहमानउल्लाह गुरबाझ (Rahmanullah Gurbaz) याला मागच्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने सामील केले होते. त्याला इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याच्या ऐवजी संघात सामील केले होते. मात्र, 20 वर्षीय या खेळाडूला मागच्या हंगामात एकही सामना खेळता आला नाही. याआधी रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाचा गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ (Jason Behrendorff) हा ट्रेडिंग विंडोच्या माध्यमाने मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. जेसनचे 3 वर्षांनंतर मुंबई संघात पुनरागमन होणार आहे.
याआधी आयपीएल स्पर्धेचे 15 हंगाम पूर्ण झाले आहेत. यंदाचा 16च्या हंगामात बरेच मोठे बदलही बघायला मिळू शकतात. या आधी झालेल्या 15 हंगामात मुंबई इंडियन्सने 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेली असून त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघाने 4 वेळा हा चषक आपल्या नावे केेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने 2 वेळा आयपीएल जेतेपदाचा मान मिळवला आहे. त्यानंंतर राजस्थान रॉयल्स, डेक्कन चार्जर्स , सनरायजर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघानी प्रत्येकी एकदा ही स्पर्दा जिंकली आहे. यंदाच्या हंगामात देखील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या खेळावर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आदिल रशिदने बाबर आझमला कसे आपल्या जाळ्यात फसवले एकदा पाहाच, आयसीसीने शेयर केला व्हिडिओ
टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी दंडावर का बांधली काळी पट्टी? ‘हे’ आहे कारण