गुरूवारी(5 नोव्हेंबर) महिला टी20 चॅलेंज अर्थात महिला आयपीएलमध्ये वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात सामना पार पडला. हा सामना स्म्रीती मंधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेझर्स संघाने 9 विकेट्सने जिंकला. या विजयात सोफी इक्लेस्टोनने 4 विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
या सामन्यात मिताली राज कर्णधार असेलल्या वेलोसिटी संघाने ट्रेलब्लेझर्स संघाला केवळ 48 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डिएंड्रा डॉटीनने आणि रिचा घोष यांनी ट्रेलब्लेझर्स संघाकडून अनुक्रमे नाबाद 29 आणि 13 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच कर्णधार मंधना 6 धावांवरच बाद झाली. तिची विकेट ले कॅस्परेकने घेतली.
तत्पूर्वी ट्रेलब्लेझर्सच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत वेलोसिटीला 15.1 षटकात केवळ 47 धावांवर रोखले. वेलोसिटीकडून शेफाली वर्मा(13), शिखा पांडे(10) आणि ले कॅस्परेक(11) या तिघींनाच दुहेरी आकडा पार करण्यात यश आले. अन्य फलंदाज फक्त खेळपट्टीवर हजेरी लावून बाद झाल्या. कर्णधार मितालीला देखील एकच धाव घेता आली.
ट्रेलब्लेझर्सकडून इक्लेस्टोनने 3.1 षटकात 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच झुलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर दिप्ती शर्माने 1 विकेट घेतली.
वेलोसिटीचा हा यावर्षीचा पहिला पराभव आहे. त्यांनी बुधवारी (4 नोव्हेंबर) सुपरनोवाज संघावर विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: विराटने चक्क तलावारीने कापला केक, पाहा बर्थडे सेलिब्रिशन
कहर चाहते! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गुगलवर शोधत आहेत कोहलीचा नंबर
” छक्के-चौके मारते रहो” युवराजच्या ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा
ट्रेंडिंग लेख –
आज वाढदिवस असणाऱ्या विराट कोहलीने केले आहेत ‘हे’ खास पराक्रम!






