---Advertisement---

” छक्के-चौके मारते रहो” युवराजच्या ‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीला अनोख्या अंदाजात शुभेच्छा

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 6:10 PM
---Advertisement---

भारताचा तसेच आयपीएल मधील बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज(5 नोव्हेंबर) 32 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला अनेक क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. यात युवराज सिंगचा देखील समावेश आहे. त्यानेही आपल्या खास अंदाजात विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज सिंगने त्याच्या स्टाईलमध्ये दिल्या शुभेच्छा

‘सिक्सर किंग’ युवराज सिंग आणि ‘रन मशीन’ किंग कोहली हे दोघेही तसे एकमेकांचे खास मित्र. युवराज सिंगने कोहलीला आणि कोहलीने युवराजला आजपर्यंत बऱ्याचदा चांगल्या खेळासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्यातील घट्ट मैत्री ही 2011 विश्वचषकापासून पाहायला मिळत आहे. 2014 साली युवराज सिंग विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघातही खेळला होता.

याच युवराजने त्याच्या अंदाजातच ट्विट करीत कोहलीला 32 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिथे असशील तिथे खुष रहा आणि चौकार षटकार मारत रहा अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याने ‘प्ले ऑफ’ साठी देखील कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/YUVSTRONG12/status/1324206887848407041

युवराज व्यतिरिक्त कोहलीला त्याच्या आयपीएल संघाने,बीसीसीआयने त्याचप्रमाणे इतर भारतीय,परदेशी क्रिकेटपटू,खेळाडू, राजकीय मंडळी,सिनेसृष्टीतील कलाकार तसेच त्याचे नातलग व मित्रपरिवाराने देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

क्वालिफायर सामन्यापूर्वी नव्या लुकमध्ये दिसला बुमराह, दिल्लीविरुद्ध मैदानात उतरताना…

बेंगलोरचा ‘हा’ स्टार क्रिकेटर फलंदाजांसाठी ठरणार डोकेदुखी, शेवटच्या टप्प्यात…

भारतीय लष्कराला सलाम! ज्या गावात अतिरेक्यांच्या खात्मा केला, तिथेच आयोजित केली क्रिकेट स्पर्धा

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

टेकडीचा हिमालय होताना!

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---