ऍशेस मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या दिवशी १९६ धावांच्या आघाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने ८४ षटकात ७ बाद ३४३ धावा केल्या आहेत. सामन्याच्या दिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासाठी ट्रेविस हेडने ९५ चेंडूत सर्वाधिक ११२ धावा केल्या आहेत. ट्रेविससाठी हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक आहे. त्याने हे शतक खूपच कमी चेंडूत केले आहे आणि स्वतःच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद देखील केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने तुफान खेळी केली, पण शतकापासून अवघ्या काही अंतरावर असताना तो बाद झाला. वॉर्नरने १४६ चेंडूत ९४ धावा केल्या. वॉर्नर शतक करण्यापासून चुकला असला, तरी ट्रेविस हेडने मात्र त्याचे शतक पूर्ण केले. त्याने अवघ्या ८५ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघासाठी हे नववे सर्वाधिक वेगवान शतक ठरले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक वेगवान शतक करणाचा विक्रम एडम गिलक्रिस्ट यांच्या नावावर आहे. गिलक्रिस्टने हा विक्रम पर्थ स्टेडियमवर केला होता. त्यानंतर या यादित जॉन ग्रेगोरी यांचे नाव आहे. डेविड वार्नरचे नाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने भारताविरुद्ध पर्थ स्टेडियमवर हा विक्रम केला होता.
ऍशेस मालिकेचा विचार केला, तर हेड तिसरा सर्वाधिक वेगवान शतक करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या सामन्यात क्रिस वॉक्सच्या ८१ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि या विक्रमाची नोंद केली आहे.
दरम्यान, ऍशेस मालिकेतील या पहिल्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाच्या एलेक्स कॅरीने त्याचे कसोटी पदार्पण केले आणि हेडसोबत ४१ धावांची महत्वाची भागिदारी पार पाडली. कॅरीने या सामन्यात १२ धावा केल्या आणि त्याची विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्सने हेडसोबत महत्वाची भागिदारी केली. कर्णधारासोबत खेळपट्टीवर खेळताना हेड पूर्णपणे सेट झाला होता आणि त्याने आक्रमक भूमिका स्वीकारली होती. कमिन्स या सामन्यात १२ धावा करून बाद झाला. कमिन्सची विकेट गेल्यानंतर मिचेल स्टार्कने त्याची साथ दिली आणि त्याच्यासोबत खेळताना हेडने त्याचे शतक पूर्ण केले.
ट्रेविस हेड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टीवर कायम आहे आणि त्याच्यासोबत मिचेल स्टार्क देखील नाबाद राहिला आहे. ट्रेविसने दुसऱ्या दिवशी केलेल्या खेळीमध्ये १२ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. इंग्लंड संघाचा विचार केला, तर ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर क्रिस वॉक्स, मार्क वुड, जॅक लिच आणि कर्णधार जो रुट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिकची वनडेतील जागा धोक्यात! ‘या’ अष्टपैलूने विजय हजारे ट्रॉफीत शतक करत ठोठावलाय टीम इंडियाचं दार
जडेजाला पर्याय म्हणून बीसीसीआय तयार करतेय धोनीचा ‘शागिर्द’; दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी झाली निवड
इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर दिग्गजाने उपस्थित केले ‘काऊंटी क्रिकेट सिस्टिम’वर प्रश्नचिन्ह