विराट कोहली आता त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेत दोन शतके ठोकली. मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात विराट विरोधी संघासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला आणि त्याने भारताला विजय देखील मिळवून दिला. नियमित कर्णधार रोहित शर्मा देखील चांगल्या फॉर्ममध्ये दिसला मात्र त्याला शतक करता आले नाही. मागच्या जवळपास तीन वर्षांपासून रोहित शर्मा शतक करू शकला नाहीये. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारततीय संघाला वनेड विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघातील फलंदाजांकडून चांगल्या प्रदर्शनाच्या अपेक्षा आहेत. रोहित मात्र मागच्या तीन वर्षात शतक करू शकला नसल्यामुळे त्याच्यावर टीका होत आहेत. विराट कोहली (Virat Kohli) देखील आशिया चषक 2022 पूर्वी अशाच प्रकारे शतकाच्या दुष्काळाला समोरे गेले होता. पण आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर त्याला पुन्हा लय सापडल्याचे दिसत आहे. विराटने मागच्या चार वनडे डावांपैकी तीन डावांमध्ये शतक ठोकले असून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
कारकिर्दीतील खराब काळात विराटवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्या. विराटने तीन वर्ष शतक केले नव्हते तेव्हा त्याच्यावर ज्या प्रमाणात टीका झाल्या, त्या प्रमाणात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर टीका होताना दिसत नाही. गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या मते विराटला ज्या पद्धतीने संघात आणि चाहत्यांकडून वागणूक मिळाली, त्याच पद्धतीने रोहितला देखील मिळाली पाहिजे. माध्यमांवर बोलताना गंभीर म्हणाला की, “आता रोहितला कठोर वागणूक दिली पाहिजे.” रविवारी तिरुअनंतपुरममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात रोहितने संघाला चांगली सुरुवात करून दिली पण 42 धावांवर विकेट गमावली.
“आता वेळ आली आहे, जेव्हा रोहितलाही कठोर वागणूक मिळाली पाहिजे, ज्या पद्धतीने काही महिन्यांपूर्वी विराट कोहलीला मिळाली. विराटसोबत आपण ज्या पद्धतीने बोलत होतो, त्याच पद्धतीने आपण रोहितसोबत बोललो पाहिजे. तुम्ही एक किंवा दोन मालिकांमध्ये शतक केले नाहीये असे नाही. ही गोष्टी मागच्या विश्वचषकापासून सुरू आहे. रोहितला शतक करण्याची सवय आहे आणि सध्या तो चांगल्या फॉर्ममध्येही आहे. तो चेंडूचा सामना चांगल्या पद्धतीने करत आहे, पण याचे रुपांतर त्याला शतकात करावेच लागेल.” असे गौतम गंभीर म्हणाला. गंभीरच्या मते भारताला विश्वचषक जिंकायचा असेल, तर विराट आणि रोहित हे दोन्ही प्रमुख फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असणे गरजेचे आहे. (‘Treat Rohit Sharma like Virat Kohli…’, Gautam Gambhar’s reaction)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटपटूंच्या मुलींबद्दल असभ्य कमेंट करणारे खाणार तुरुंगाची हवा; दिल्ली पोलिसांनी सुरू केली कारवाई
विराटचा शब्द म्हणजे दगडावरची रेष! सांगून ठोकली बॅक-टू-बॅक सेंच्युरी, व्हिडिओ पाहाच