इंडियन प्रीमिअर लीग २०२२चे साखळी सामने मुंबई आणि पुणे स्थित चार स्टेडियमवर खेळवले जात आहेत. या चारही मैदानांवर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत आहे. हवेतील दवामुळे गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असले, तरी काही गोलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून दाखवले आहेत. यापैकीच एक ठरला आहे ट्रेंट बोल्ट, ज्याने रविवारी (दि. १० एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या.
आयपीएल २०२२चा (IPL 2022) २०वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Boult) राजस्थानसाठी पहिले षटक टाकले आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. लखनऊचा कर्णधार केएल राहुल आणि कृष्णप्पा गौतम एकही धाव न करता बोल्टच्या चेंडूचा शिकार ठरले. दरम्यान, बोल्टने आयपीएल २०२० नंतर डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी सर्वात जास्त वेळा केली आहे.
KL Rahul b Boult 0 (1) ⚡ pic.twitter.com/vKA3CrxxlU
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2022
ही आयपीएल २०२०नंतर १२वी वेळ आहे, जेव्हा ट्रेंट बोल्टने डावाचे पहिले षटक टाकताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आहे. चालू आयपीएल हंगामात आर्चर खेळत नाहीये, पण त्याने आयपीएल २०२० नंतर जेवढे सामने खेळले, त्यापैकी ५ वेळा त्याने डावाचे पहिले षटक टाकताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दीपक चाहर (Deepak Chahar) आहे, ज्याने ही कामगिरी ४ वेळा केली आहे.
दरम्यान, रविवारी खेळल्या गेलेल्या लखनऊ आणि राजस्थान (LSG vs RR) संघातील या सामन्याचा विचार केला, तर लखनऊचा कर्णधार केएल राहुलने सर्वात आधी नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्सच्या नुकसानावर १६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊने २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १६२ धावा केल्या. परिणामी राजस्थान रॉयल्सने हा सामना ३ धावांनी जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल आला, बोल्टने पाहिला अन् थेट तंबूतही धाडला, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘झक्कास’
मुंबईच्या सलग चौथ्या पराभवानंतर रोहितची पत्नी झाली खूपच नाराज; व्हिडिओतील रिऍक्शन पाहाच






