सध्या बांगलादेश संघ न्यूझीलंड (Bangladesh tour of newzealand) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेश संघाने जोरदार विजय मिळवला होता. तर दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला होता. तर गोलंदाजी करताना देखील न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेश संघातील फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. दरम्यान न्यूझीलंड संघातील दिग्गज गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने (Trent Boult) मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
क्राइस्टचर्चच्या मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी (१० जानेवारी) ट्रेंट बोल्टने मोठा कारनामा केला आहे. बांगलादेश संघाचा फलंदाज मेहदी हसनला बाद करताच, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे (300 wickets in test). न्यूझीलंड संघाकडून असा कारनामा करणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी रिचर्ड हेडली (Richard Headley), डॅनियल विटोरी (Daniel Vittori) आणि टीम साऊदीने (Tim Southee) असा कारनामा केला होता.
व्हिडिओ पाहा-
या बाबतीत दिग्गजांना टाकले मागे
सर्वात जलद ३०० गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ट्रेंट बोल्टने टीम साऊदी, जेम्स अँडरसन (James Anderson) आणि नाथन लायन (Nathon Lyon) सारख्या गोलंदाजांना मागे टाकले आहे. ट्रेंट बोल्टने ७५ व्या कसोटी सामन्यात असा कारनामा केला आहे. तर टीम साऊदीने ७६, नाथन लायनने ७७ आणि जेम्स अँडरसनने ८१ व्या कसोटी सामन्यात असा कारनामा केला होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३०० गडी बाद करण्याचा कारनामा आर अश्विनने केला आहे. त्याने ५४ व्या कसोटी सामन्यात असा कारनामा केला होता. तर न्यूझीलंड संघाकडून रिचर्ड हेडलीने ६१ कसोटी सामन्यात ३०० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता.
⚡️ Trent Boult was unstoppable on day two at Christchurch.#WTC23 | #NZvBAN pic.twitter.com/SWApz6PksI
— ICC (@ICC) January 10, 2022
बांगलादेश संघाचा डाव १२६ धावांवर संपुष्टात
कर्णधार टॉम लॅथमच्या द्विशतकी आणि डेवोन कॉनवेच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात ५२१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात बांगलादेश संघाला अवघ्या १२६ धावा करण्यात यश आले आहे. न्यूझीलंड संघाकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक ५ गडी बाद केले. यासह तो त्याने कसोटी कारकिर्दीत ९ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘किंग कोहली’ एका इंस्टाग्राम पोस्टमधून कमावतो कोट्यावधी रुपये, आकडा ऐकून बसेल धक्का
पंतवर टीकेचा भडिमार सुरूच! गावसकर, मदललाल यांच्यानंतर ‘हा’ दिग्गज संतापला
हे नक्की पाहा: