लंडन। बुधवारी(5 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात 9 वा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. हा त्यांचा या विश्वचषकातील सलग दुसरा विजय ठरला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडकडून ट्रेट बोल्टने 10 षटकात गोलंदाजी करताना 44 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याने बांगलादेशच्या मुसद्दक हुसेन आणि मेहदी हसन यांना बाद केले. त्यामुळे त्याने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्स घेण्याचा टप्पा पार केला आहे. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
त्याने वनडेमध्ये 81 सामन्यात खेळताना 150 विकेट्सचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीच्या 82 वनडे सामन्यात 150 विकेट्स टप्पा गाठण्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे. लीने 20 फेब्रुवारी 2004 ला श्रीलंका विरुद्ध खेळताना 150 वनडे विकेट्सचा टप्पा पार केला होता.
वनडेमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेण्याचा विक्रम पाकिस्तानचे दिग्गज माजी ऑफ स्पिनर सक्लेन मुश्ताक यांच्या नावावर आहे. त्यांनी वनडेत 78 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या होत्या. हा विक्रम त्यांनी 16 जानेवारी 1998 ला भारताविरुद्ध खेळताना केला होता.
याबरोबरच बोल्ट वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा न्यूझीलंडचा एकूण 8 वा गोलंदाज आहे. याआधी डॅनिएल व्हिट्टोरी(297),काइल मिल्स(240), ख्रिस हॅरिस(203), ख्रिस केर्न्स(200), टिम साऊथी(185), जाकोब ओरम(173) आणि रिचर्ड हॅडली(158) यांनी हा पराक्रम केला आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेणारे गोलंदाज –
78 सामने – सक्लेन मुश्ताक
81 सामने – ट्रेंट बोल्ट
82 सामने – ब्रेट ली
84 सामने – अजंता मेंडीस
89 सामने – ऍलेन डोनाल्ड / इम्रान ताहिर / मॉर्ने मॉर्केल
After his two wickets today, @trent_boult became the second fastest bowler to take 150 ODI wickets ???? pic.twitter.com/Nu2ivCgUMp
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 5, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले असे काही…
–रोहित शर्माच्या शतकामुळे भारताच्या नावावर झाला हा विश्वविक्रम
–कर्णधार कोहलीने केले खास अर्धशतक, दिग्गज विव रिचर्ड्स यांनाही टाकले मागे






