आयपीएल 2024 चा दुसरा क्वालिफायर सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ट्रेंट बोल्टनं टी20 क्रिकेटच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं.
जर आपण टी20 क्रिकेटच्या इतिहासावर नजर टाकली, तर आतापर्यंत फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी पहिल्या 6 षटकांमध्ये 100 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. आता या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचंही नाव जोडलं गेलं आहे. आयपीएल 2024 च्या क्वालिफायर 2 सामन्यात त्यानं ही कामगिरी केली.
ट्रेंट बोल्टनं 2015 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले होतं. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडूनही खेळला आहे. बोल्टनं आपल्या टी20 कारकिर्दीत इतर अनेक संघांचंही प्रतिनिधित्व केलं आहे.
हैदराबादविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यात बोल्टनं पॉवरप्ले ओव्हर्समध्ये तीन विकेट घेतल्या. त्यानं पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा आणि पाचव्या षटकात राहुल त्रिपाठीची विकेट घेत टी20 क्रिकेटच्या पॉवरप्ले षटकांमध्ये 100 बळी पूर्ण केले. त्यानं डावाच्या पाचव्या षटकात एडन मार्करमलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यासह ट्रेंट बोल्टनं आता टी20 मध्ये पहिल्या 6 षटकात 101 विकेट्स घेतल्या आहेत. ट्रेंट बोल्टनं आतापर्यंत 223 टी20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 254 विकेट घेतल्या आहेत.
पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली अव्वल स्थानावर आहे. डेव्हिड विलीनं त्याच्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 292 सामने खेळत 295 बळी घेतले आहेत. त्यापैकी 128 बळी पॉवरप्ले ओव्हर्समध्ये आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भारताचा भुवनेश्वर कुमार आहे. भुवनेश्वरनं आपल्या टी20 कारकिर्दीत आतापर्यंत 284 सामन्यांत 299 बळी घेतले आहेत. यापैकी त्यानं 118 विकेट पहिल्या 6 षटकांतच घेतल्या आहेत.
टी20 पॉवरप्लेमध्ये 100 विकेट घेणारे गोलंदाज
डेव्हिड विली – 128 (292 सामने)
भुवनेश्वर कुमार – 118 (284 सामने)
ट्रेंट बोल्ट – 101 (223 सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 साठी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते दिल्ली कॅपिटल्स, वॉर्नर-शॉ होणार रिलीज!