बांगलादेशविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडने 8 गडी राखून जिंकला. या विजयात मोलाची भूमिका पार पाडणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सामनावीर ठरला. यानंतर मोठे पणा दाखवत सामनावीर पुरस्कारात मिळालेली 500 डॉलर्सची रक्कम त्याने त्याच्या होम टाउन क्लब ओटोमेटाई कैडेट्सला देणगी दिली आहे.
या सामन्यात बोल्टने 27 धावा देत 4 गडी बाद केले. बांगलादेशचा कर्णधार तमिम इक्बाल त्याची पहिली शिकार ठरला. पाचव्या षटकात अवघ्या १३ धावांवर त्याने इक्बालचा पायचित केले. त्यानंतर सौम्य सरकार, तस्किन अहमद आणि हसन महमूद त्याच्या गोलंदाजीच्या जाळ्यात फसले. याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
न्यूझीलंड क्रिकेटने ट्विटरवर बोल्टचा व्हिडिओ शेअर करताना असे लिहिले आहे की, ‘ट्रेंट बोल्टला 27 चेंडूत 4 बळी घेतल्याने प्लेअर ऑफ द मॅच (सामनावीर) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर बोल्टने त्याच्या होम टाउन क्लब ओटोमेटाई कैडेट्सला पुरस्कारात मिळालेली 500 डाॅलरची देणगी दिली आहे.’
What does club cricket mean to Trent Boult? The @ANZ_NZ Player of the Match gave his $500 club donation from ANZ to his hometown club Otumoetai Cadets #NZvBAN pic.twitter.com/grvPWe6UVs
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 20, 2021
सामन्याबद्दल सांगयचे झाले तर, बांगलादेशचे खेळाडू प्रथम फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसले. त्यामध्ये महमूदुल्लाने 27 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. बांगलादेशच्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोलस यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. सहाव्या षटकात तस्कीन अहमदने गप्टिलला 38 धावांवरती बाद केले.
यानंतर डेवोन कोनवे आणि निकोलस यांच्यात 65 धावांची भागीदारी झाली. 20 व्या षटकात कोनवे 27 धावा करून बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या 119 होती. न्यूझीलंडकडे 30 षटके आणि 8 विकेट शिल्लक असताना २१.१ षटकांत संघाने विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. निकोलस 49 आणि विल यंग 11 धावांवरती नाबाद राहिले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे’ दोन भारतीय खेळाडू टी२० विश्वचषकात खेळण्यास सज्ज, सचिन तेंडुलकरचा व्यक्त केले मत
‘कॅप्टन’ कोहलीचा मोठेपणा! मालिका विजयानंतर ट्रॉफी सोपवली सुर्यकुमार आणि इशान किशनकडे, पाहा व्हिडिओ
टी२०मध्ये ‘कर्णधार’ कोहलीचीच हवा! विलियम्सन, फिंच, मॉर्गन सर्वांनाच वरचढ ठरत गाठला अव्वल क्रमांक