---Advertisement---

बोल्टच्या हेल्मेटमध्ये अडकला चेंडू आणि मग जे घडले ते पाहून कुणालाही हसू लपवता आले नाही!

On: शुक्रवार, ऑगस्ट 16, 2019 4:28 PM
---Advertisement---

श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी(15 ऑगस्ट) एक मजेशीर घटना घडली. ते पाहुन सर्वांनाच हसू आले.

या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट फलंदाजी करत असताना 82 व्या षटकात लसिथ एम्बुलदेनिया गोलंदाजी करत होता. यावेळी या षटकातील एका चेंडूवर बोल्टने स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या कड्याला लागून थेट त्याच्या हेल्मेटच्या ग्रिल्समध्ये अडकला.

त्यानंतर काही सेकंद बोल्टलाही कळाले नाही की चेंडू कुठे गेला. पण जेव्हा त्याच्या हे लक्षात आले तेव्हा श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण बोल्ट त्यांच्यापासून दूर पळत होता. अखेर श्रीलंकेच्या एका खेळाडूने तो चेंडू बोल्टच्या हेल्मेटच्या ग्रिल्समधून बाहेर काढला.

ही घटना पासून बोल्टसह श्रीलंकेच्या खेळाडूंनाही हसू आवरता आले नाही.

त्यानंतर बोल्टला काही दुखापत झाली नाही ना याची चौकशी केल्यानंतर पंचांनी पुन्हा खेळ सुरु केला. या घटनेचा फोटो आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://twitter.com/ICC/status/1161895552398872581

https://twitter.com/ooccricket/status/1161998041714438144

या सामन्यात बोल्टने 22 चेंडूत 18 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 1 षटकार मारला. त्याच्या या खेळीमुळे न्यूझीलंडला अखेर सर्वबाद 249 धावसंख्या पहिल्या डावात उभारता आली.

न्यूझीलंडकडून या डावात रॉस टेलरने 86 धावांची सर्वोच्च खेळी केली. तसेच हेन्री निकोल्सने 42 धावांची छोटेखानी खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही. श्रीलंकेकडून अकिला धनंजयाने 5 आणि सुरंगा लकमलने 4 विकेट्स घेतल्या. बोल्टलाही लकमलनेच नंतर बाद केले.

त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव 267 धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून कुशल मेंडीस(53) अँजेलो मॅथ्यूज(50) आणि निरोशान डिकवेल्लाने(61) अर्धशतकी खेळी केल्या. तर न्यूझीलंडकडून आजाझ पटेलने 5, विल्यम सोमरविलने 3 आणि बोल्टने 2 विकेट्स घेतल्या. सध्या न्यूझीलंड 18 धावांनी पिछाडीवर आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आज यावेळी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

या कारणामुळे माजी क्रिकेटपटू व्हीबी चंद्रशेखर यांचे झाले निधन, पोलिसांनी केला मोठा खूलासा

भारतीय क्रिकेटपटूंनी अशा दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment