---Advertisement---

पंजाब किंग्जला मिळाला विश्वविजेता प्रशिक्षक, आयपीएल ट्रॉफीही केलीये नावावर

On: शुक्रवार, सप्टेंबर 16, 2022 4:20 PM
Trevor Bayliss
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन दिग्गज ट्रेवर बेलिय आयपीएल फ्रेंचायझी पंजाब किंग्ज संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. यापर्वी त्यांच्या मार्गदर्शनात इंग्लंड क्रिकेट संघाने आयसीसीचा एकदिवसीय फॉरमॅटमधील विश्वचषक जिंकला होता. आता वज्याच्या 59 व्या वर्षी ते पंजाब किंग्जला आयपीएल विजेता संघ बनवण्यासाठी प्रयत्न करतील. आयपीएलमध्ये यापूर्वी त्यांनी सनरायझर्स हैदराबद संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे.

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या मार्गदर्शनानत पंजाब किंग्ज एकदाही आयपीएल प्लेऑफ्समध्ये पोहोचू शकला नाही. अशात ट्रेवर बेलिस (Trevor Bayliss) यांच्याकडून संघ आणि त्यांच्या चाहत्यांना नक्कीच खूप अपेक्षा आहेत. कुंंबळे मागच्या तीन वर्षांमध्ये पंजाब किंग्जला एकदाही प्लेऑफ्समध्ये पोहोचवू शकले नाहीत. याच पार्श्वभूमीवर संघाने आगामी हंगामासाठी ट्रेवर बेलिस यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या कार्यकाळात पंजाबने 42 आयपीएल सामने खेळले आणि त्यापैकी 18 सामन्यांमध्ये विजत तर 22 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला होता. राहिलेल्या दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नव्हता.

ट्रेवर बेलिसच्या मार्गदर्शनात इंग्लंडने 2019 साली खेळला गेलेला आयसीसी विश्वचषक (एकदिवसीय) जिंकला होता. त्यानंतर त्यांना आयपीएलमध्ये सनराझर्स हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्याआधी 2012 आणि 2014 साली कोलकाता नाईट रायडर्सने जेंव्हा आयपीएलजे विजेतेपद पटकावले, तेव्हा देखील ब्रेलिस केकेआरच्या सपोर्ट स्टाफचा भाग होते. त्यांना आजपासून एक दशत आधी बीग बॅश लिगमध्ये सिडनी सिक्सर्सला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठीही महत्वाची भूमिका पार पाडली होती. तसेच त्यांनी शेफिल्ड स्पर्धेत न्यू साउथ वेल्स संघाच्या प्रशिक्षकपदीही काम केले आहे.

दरम्यान, पंजाब संघाच्या आयपीएलमधील आजवरच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ते समाधानकारण राहिले नाहीये. आयपीएल पहिला संघा 2008 साली खेळला गेला होता. पंजाब किंग्ज या पहिल्या हंगामापासून खेळत असला, तरी त्यांना अद्याप फक्त दोन वेळा प्लेऑफ्समध्ये जागा बनवता आली आहे, ज्यापैकी एकदा ते अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले होते. मागच्या वर्षी पंजाबने आयपीएलच्या मेगा लिलिवापूर्वी मयंक अगरवाला रिटेन केले होते. परंतु कर्णधाराच्या रूपात त्याचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले. याच कारणास्तव अशा चर्चात समोर येत आहेत की, संघ पुढच्या हंगामापूर्वी मयंकच्या जागी नवीन कर्णधाराची नियुक्ती केली जाऊ शकते. असे असले तरी, पंजाब किंग्जने मात्र बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

‘आधी कोहलीच्या लेव्हलचा हो, मग कर्णधार बन’, पाकिस्तानी क्रिकेटरचाच आझमला कटू सल्ला
ब्रेकिंग! सॅमसन बनला भारताचा कर्णधार, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मिळाली जबाबदारी
आयपीएल 2023मध्ये मुंबईच होणार चॅम्पियन? मागील नऊ वर्षाचा योगायोग येणार जुळून  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---