---Advertisement---

IND vs SL: गौतम गंभीर यांचं प्रशिक्षक पद धोक्यात? श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरी करण्याचं दडपण

On: शनिवार, ऑगस्ट 8, 2026 10:31 PM
---Advertisement---

टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Team india’s Head Coach Gautam Gambhir) यांनी जबाबदारी स्वीकारल्यापासून, कसोटी क्रिकेटमधील संघाची कामगिरी चांगली राहिलेली नाही. भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियानेही भारताचा धुव्वा उडवला आहे. केवळ इंग्लंडविरुद्धची मालिका भारताने अनिर्णित (ड्रॉ) राखली आहे.

या सर्व खराब कामगिरीमुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर कमालीच्या दबावाखाली आहेत. जर श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतही भारताचा पराभव (IND vs SL) झाला, तर गंभीर यांना कसोटी फॉरमॅटमधील मुख्य प्रशिक्षकाच्या पदावरून हटवले जाऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार, जर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही संघाला पराभवाचा सामना करावा लागला, तर त्यांना या फॉरमॅटमधून बाहेर केले जाऊ शकते आणि त्यांच्या जागी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (V.V.S. Laxman) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नुकताच इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही असाच एक निर्णय घेतला आहे. त्यांनी वनडे आणि टी-20 साठी ब्रेंडन मॅक्युलम यांना प्रशिक्षक बनवले, तर कसोटी फॉरमॅटची जबाबदारी स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडे सोपवली आहे.

आता असाच फॉर्म्युला टीम इंडियामध्येही पाहायला मिळू शकतो. मात्र, श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने विजय मिळवून गौतम गंभीर आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्याच्या प्रयत्नात असतील. मात्र, त्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---