अहमदाबाद| इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. याचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. रविवारी (२९ मे) होणारा हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. गुजरात संघाचा हा पदार्पणाचा हंगाम असून त्यांनी हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली आहे. त्यांनी साखळी सामन्यातील १४ पैकी १० सामन्यात विजयी होत गुणतालिकेत प्रथम स्थान गाठले होते.
या हंगामात गुजरातचा फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) चांगली गोलंदाजी केली आहे. त्याची गोलंदाजी इतकी प्रभावी आहे की विरुद्ध संघाचे फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर कमी धावा घेऊन बाकीच्यांच्या गोलंदाजीवर अधिक धावा काढतात. याच गोष्टीचा फायदा घेत राशिदने समोरच्या संघावर आपला दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
आयपीएलचा सहावा हंगाम खेळणाऱ्या राशिदने या हंगामात १५ सामन्यांमध्ये ६.७४च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. त्याने या हंगामात एका बाजूने फलंदाजावर दबाव ठेवला आहे जेणेकरून बाकी गोलंदाज आक्रमक गोलंदाजी करेल आणि फलंदाज चुका करतील.
“माझी गोलंदाजी ही प्लेऑफमध्ये काही वेगळी नव्हती. मला माहित आहे विरुद्ध संघाचे फलंदाज माझ्या गोलंदाजीवर धावा घेण्याचा अधिक प्रयत्न करत नाही. ते बाकी गोलंदाजांच्या गोलंदाजीवर अधिक धावा काढण्याचा प्रयत्न करतात. यातच त्यांच्या विकेट्स काढण्याच्या संधीही वाढतात,” असे राशिदने अंतिम सामन्यापूर्वी म्हटले आहे.
“साखळी सामना असो वा प्लेऑफचा सामना माझी गोलंदाजी सारखीच असते, पण माझा हेतू हा फलंदाजांवर दबाव कायम ठेवण्याचा असतो,” असेही राशिद पुढे म्हणाला.
अफगाणिस्तानच्या राशिदने या हंगामात गोलंदाजी बरोबरच फलंदाजीतही आपला हात दाखवला आहे. “माझ्यावर कर्णधार, संघसहकारी आणि प्रशिक्षण स्टाफ यांनी आत्मविश्वास दाखवल्याने मी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यासाठी मी नेटमध्ये फलंदाजीचा अधिक सरावही केला,” असे या हंगामात २०६.८२च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या आणि ९ षटकार मारणाऱ्या राशिदने म्हटले आहे. त्याने ७ झेल घेत क्षेत्ररक्षणही चांगले केले आहे.
मागील हंगामात सनरायझर्स हैद्राबादकडून खेळणाऱ्या राशिदला या हंगामाच्या लिलावामध्ये गुजरातने १५ कोटी रूपयांमध्ये संघात विकत घेतले. २०१८च्या हंगामात तो सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याने हैद्राबादकडून खेळताना १७ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिकडे आई आजारी, पण राजस्थानला चॅम्पियन बनवण्यासाठी झुंज देतोय ‘हा’ खेळाडू, खुद्द प्रशिक्षकाचा खुलासा
बेंगलोरला धूळ चारत हॉटेलवर पोहोचताच राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन; Video Viral