---Advertisement---

आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडे अन् सूनबाईंच्या शुभेच्छा एकीकडे, मयंतीची अध्यक्ष बिन्नींंसाठी खास पोस्ट

On: गुरूवार, ऑक्टोबर 20, 2022 5:53 PM
Roger-Binny-And-Mayanti-Langer
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नवीन अध्यक्ष मिळाला आहे. सौरव गांगुली यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांना अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. 1983च्या विश्वचषक विजेत्या कपिल देव यांच्या नेतृत्वातील संघात सामील असलेल्या बिन्नी यांनी पदभार सांभाळल्यानंतर गांगुलींपासून ते क्रिकेटपटू आणि चाहत्यांपर्यंत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या यादीत स्पोर्ट्स एँकर आणि रॉजर बिन्नी यांची सून मयंती लँगर हिनेदेखील एक फोटो शेअर करत एका इमोजीसह प्रत्येकाचे मन जिंकले.

मयंती लँगर (Mayanti Langer) हिने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट एक फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने ग्रीनिंग फेस असणाऱ्या इमोजीचा वापर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेली मयंती ही रॉजर बिन्नी (Roger Binny) यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याची पत्नी आहे. ती प्रेग्नंसी आणि मुलाच्या जन्मानंतर खूप वेळा टीव्हीवर दिसत नाहीये. तिच्या चाहत्यांच्या संख्येवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की, ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रेंडही होत असते. तिच्या सुंदरतेचा प्रत्येक चाहता दीवाना आहे.

दुसरीकडे, एँग्लो इंडियन असलेल्या रॉजर बिन्नी यांनी बिनविरोध बीसीसीआय अध्यक्षपद भूषवले आहे. टी20 विश्वचषकापूर्वी त्यांनी हा पदभार सांभाळला आहे. ते असे पहिलेच बीसीसीआय अध्यक्ष आहेत, जे क्रिकेटपटूव्यतिरिक्त प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांनी विश्वचषकात 18 विकेट्स घेऊन भारतीय संघाला विजेतेपद जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

रॉजर बिन्नी यांची कारकीर्द
रॉजर बिन्नी यांच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी भारताकडून 27 कसोटी आणि 72 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये कसोटीत त्यांनी 47 विकेट्स आणि वनडेत 77 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या नावावर कसोटीत 5 अर्धशतकांसह 830 धावा आहेत. तसेच, ते एक शानदार अष्टपैलूही आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाला आपल्या बॅटमधून विजय मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे, स्टुअर्ट बिन्नी यानेही भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने ‘या’ पोरीला बनवले सोशल मीडिया स्टार, एकाच फोटोमुळे झाली सगळीकडे व्हायरल
‘बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का?’, विश्वचषकाच्या प्रश्नावर भडकला पाकिस्तानी दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---